Meteorology Department : थंडीचा कडाका वाढला, पुढील २४ तासांत पावसाची शक्यता; वाचा …हवामानविषयक घडामोडी

राज्याच्या अनेक भागात २२ आणि २३ नोव्हेंबरला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

133
Meteorology Department : थंडीचा कडाका वाढला, पुढील २४ तासांत पावसाची शक्यता; वाचा ...हवामानविषयक घडामोडी
Meteorology Department : थंडीचा कडाका वाढला, पुढील २४ तासांत पावसाची शक्यता; वाचा ...हवामानविषयक घडामोडी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा (Cyclone) परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशात वातावरणात घट झाली आहे. पुढील २४ तासांत देशातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ((Meteorology Department)) वर्तवण्यात आली आहे.

राज्याच्या अनेक भागात २२ आणि २३ नोव्हेंबरला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. केरळ, अंदमान आणि निकोबार बेटांवर, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे, तर केरळमधील कोझिकोड, तिरुवनथपुरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर आणि तामिळनाडूमध्ये नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात आजही पावसाची शक्यता आहे.

(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Accident : एंडोस्कोपी कॅमेऱ्यातून प्रत्यक्ष दिसले ४१ कामगार )

महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा
देशभरातील हवामानात घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी तापमान घसरल्याने लोक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. झारखंड आणि आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधील तापमानातही घट झाली आहे. जम्मू-काश्मीरसह हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता आहे. गोवा, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही धुक्याची चादर पसरली असून थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रासह इतर भागातही तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा वाढला आहे.

काही विशेष घडामोडी… 
– २३ नोव्हेंबर रोजी पश्चिम हिमालय पर्वताच्या वरच्या भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे.
– आगामी आठवड्याच्या शेवटी गुजरातमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.
– आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.