Konkan: वाडगावात कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळावा अशी मागणी जयेंद्र भगत यांनी तटकरे यांच्याकडे केली होती.

176
Konkan: वाडगावात कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र सुरू होणार
Konkan: वाडगावात कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

पश्चिम महाराष्‍ट्र, तेथील लाल मातीत रंगणारा कुस्‍तीचा फड, पैलवानांना घडवणाऱ्या तालमी आता कोकणातही ( Konkan) रंगणार आहेत. अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे कोकणातील पहिले कुस्ती प्रशिक्षण केंद्र असेल.

या कामासाठी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या खासदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कुस्ती खेळाला कोकणात आगामी काळात चालना मिळेल, अशी आशा आहे. अलिबाग तालुका कुस्‍तीगीर संघाचे अध्‍यक्ष आणि जय हनुमान तालीम संघाचे जयेंद्र भगत यांनी आता यासाठी पुढाकार घेतला आहे.

(हेही वाचा – वाडगावात होणार कोकणातील पहिले कुस्‍ती प्रशिक्षण केंद्र )

नवीन पिढीला कुस्‍ती खेळाविषयी तंत्रशुदध माहिती व्‍हावी, योग्‍य मार्गदर्शन व्‍हावे, या खेळाबद्दल आवड निर्माण व्‍हावी यासाठी गेली अनेक वर्षे त्‍यांचे प्रयत्‍न सुरू आहेत. कुस्‍ती प्रशिक्षण केंद्रासाठी निधी मिळावा अशी मागणी जयेंद्र भगत यांनी तटकरे यांच्याकडे केली होती. त्‍यांची मागणी तात्‍काळ मान्‍य करत आपल्‍या खासदार निधीतून व्‍यायामशाळेसाठी ५० लाख रूपयांचा निधी उपलब्‍ध करून दिला आहे. त्‍याचे पत्रदेखील नुकतेच तटकरे यांनी जयेंद्र भगत यांच्‍याकडे सुपूर्द केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.