Mumbai Police Threat Call : “मुंबईत मोठा कांड करणार”, पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे.

189
Crime : पाकिस्तानच्या क्रमांकावरून व्यावसायिकाला फोन; मुलाला सोडविण्यासाठी मागितली ४० हजारांची रक्कम

दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, “मुंबईत मोठा कांड होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या आहेत. (Mumbai Police Threat Call)

मुंबई पोलिसांना  पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर  असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची फोनवरुन माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. (Mumbai Police Threat Call)

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने दावा केला आहे. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या हवाली केले आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.

(हेही वाचा : Pune Accident : पुण्यात एसटी बसची सात वाहनांना धडक, सहाजण जखमी

यापूर्वी अनेक धमक्यांचे फोन
मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत.आतापर्यंत आलेल्या धमकीच्या फोनपैकी 90 टक्के हे फेक कॉल होते. त्याआधीही मुंबई कंट्रोल रुमला अनेक वेळा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती.महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या. यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.