आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ट्रान्सजेंडर क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली आहे. खेळाची अखंडता आणि आवड कायम जपली जावी, यासाठी आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता ट्रान्सजेंडर खेळाडू (Transgender players) महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारे खेळू शकणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये मंगळवारी झालेल्या ICCच्या बैठकीत याला दुजोरा दिला आहे.
(हेही वाचा – Simcard New Rule : सिमकार्ड चे नवीन नियम १ डिसेंबर पासून लागू , जाणून घ्या अन्यथा जाल तुरुंगात)
आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘नवीन धोरण काही तत्त्वांवर आधारित आहे. ज्यात प्राधान्यक्रम, महिलांची खेळाची अखंडता, सुरक्षितता, निष्पक्षता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश आहे आणि याचा अर्थ असा आहे की, कोणतीही ट्रान्सजेंडर व्यक्ती लिंग बदल शस्त्रक्रिया झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट खेळात भाग घेऊ शकणार नाही.’
महिला क्रिकेटला चालना…
२०२३ मध्ये प्रथमच भारतात महिला आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. जे महिला प्रीमियर लीग म्हणून ओळखले जात होते. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात एकूण पाच संघ सहभागी झाले होते. मागच्या वेळेप्रमाणे २०२४ मध्ये महिला प्रीमियर लीग खेळवली जाईल. याचा अर्थ आंतराराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त महिला क्रिकेटलाही फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. एकंदरीत महिला क्रिकेटला दिवसेंदिवस प्रोत्साहन मिळत असून या खेळात वाढ व्हायला मदत होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community