‘Google pay’वापरता का? नुकसान टाळण्यासाठी ‘या’ चुका टाळा, वाचा…गुगल कंपनीचा सल्ला

132
'Google pay'वापरता का? नुकसान टाळण्यासाठी 'या' चुका टाळा, वाचा...गुगल कंपनीचा सल्ला
'Google pay'वापरता का? नुकसान टाळण्यासाठी 'या' चुका टाळा, वाचा...गुगल कंपनीचा सल्ला

देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट अॅप्सपैकी गुगल पे (Google pay) हे अलिकडच्या काळातील सर्वोत्तम अॅप समजले जाते. हा अलिकडच्या काळातला डिजिटल पेमेंटचा सर्वोत्कृष्ट पर्याय मानला जातो. कधीही, कुठेही पेमेंट करण्यासाठी बहुसंख्य लोक या अॅपचा वापर करतात. गुगल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फिचर आणत आहे. यामुळे ग्राहकांना अधिक चांगली सुविधा मिळू शकते, मात्र गुगल पेचा वापर करताना काळजी घेणेही आवश्यक आहे.

भारतभरात ऑनलाईन पेमेंट वाढल्याने गुगल कंपनी गुगल पे अॅपमध्ये सुरक्षिततेची विशेष काळजी घेते. यासाठी कंपनी सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial intelligence)म्हणजे एआय टेक्नॉलॉजी (AI Technology) याचा वापर करते तसेच ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याबाबतही काळजी घेते. गुगल कंपनीच्या म्हणण्यानुसार, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतत कार्य करत आहोत, पण गुगल पेवर ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे गुगल पे वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी माहिती देण्यात आली आहे.

“हे” अॅप्स बंद ठेवणे आवश्यक…
– गुगल पेद्वारे डिजिटल पेमेंट करताना इतर काही अॅप्स बंद ठेवणे आवश्यक आहे. यामधील एक म्हणजे स्क्रीन शेअरिंग अॅप. गुगल पे (Google Pay) वापरताना स्क्रीन शेअरिंग अॅप बंद ठेवणं महत्त्वाचं आहे.

– तुम्ही जर इतर कोणतेही अॅप वापरत असाल, तर पेमेंट अॅप वापरण्यापूर्वी ते अॅप बंद करा, कारण हे धोकादायक ठरू शकते, असा इशारा गुगल कंपनीने दिला आहे.

(हेही वाचा-  Zero Waste Management : शून्य कचरा व्यवस्थापनासाठी झटणाऱ्या अस्मिता गोखले)

स्क्रीन शेअरिंग अॅप्स का उघडू नयेत…जाणून घ्या कारण
– गुगल पे (Google Pay)ने हे अॅप उघडण्यामागे ग्राहकांना काही महत्त्वाची कारणंही आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्कॅमरना तुमचे डिव्हाईइस नियंत्रित करण्याचा पर्याय मिळतो. जो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
-स्कॅमर तुमच्या फोनद्वारे व्यवहार करू शकतात.
-सायबर गुन्हेगार एटीएम किंवा डेबिट कार्डचे तपशील जाणून घेऊन त्याचा गैरवापर करू शकतात.
– सायबर गुन्हेगारांना तुमच्या फोनचं नियंत्रण स्कॅमरना सर्व OTP आणि SMSवर नियंत्रण मिळेल, याचा स्कॅमर गैरवापर करू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.