खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून कॅनडाने भारताबरोबरचे संबंध कमालीचे बिघडवून टाकले होते.याचपार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. मात्र आता केंद्र सरकारने भारत सरकारने दोन महिन्यांनतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (India -Canada Crisis)
कॅनडाच्या दाव्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर गेले होते. भारताने दोन महिन्यांपूर्वी कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. कॅनडाने या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली होती.कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने हे सकारात्मक पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.यासंदर्भात एका वृत्तपत्राने माहिती दिली आहे.
(हेही वाचा : ‘Google pay’वापरता का? नुकसान टाळण्यासाठी ‘या’ चुका टाळा, वाचा…गुगल कंपनीचा सल्ला)
व्यावसायिक कामासाठी अनेक कॅनडियन नागरिक भारतात येत असतात. भारत सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.भारत सरकारने काही विशिष्ठ श्रेणीतील नागरिकांसाठी व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यानंतर आता ई-व्हिसा सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅनडियन नागरिकांना भारतीय आयुक्तालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने व्हिसासाठी अप्लाय करता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community