मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर मार्गाला (‘कॉरिडॉर’ला) अलाहाबाद उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. (banke bihari temple corridor) कुंज रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचा आदेशही देण्यात आला आहे; मात्र त्याच वेळी मंदिराच्या बँक खात्यात जमा झालेली २६२ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम हा मार्ग बांधण्यासाठी वापरण्याची अनुमती सरकारला दिली नाही. सरकारने स्वतःचा पैसा यासाठी वापरावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. उत्तरप्रदेश सरकार मंदिराभोवती ५ एकर जागेवर हा मार्ग बनवणार आहे. (Mathura Corridor)
(हेही वाचा – Hanuman Stotra : हनुमान स्तोत्राचे काय आहे महत्व? का करावे याचे पठण?)
सरकार प्रस्तावित योजनेनुसार पुढे जाऊ शकते; परंतु दर्शनासाठी येणार्यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागू नये. एकदा अतिक्रमण हटवल्यानंतर या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही आणि मंदिराच्या प्रवेशाच्या रस्त्यांवर कोणताही अडथळा येणार नाही, याची सरकारने काळजी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Mathura Corridor)
जनहित याचिकेवर निर्णय
अनंत शर्मा, मधुमंगल दास आणि इतरांच्या वतीने वर्ष २०२२ मध्ये जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. सर्वसाधारण दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या ४० ते ५० हजार असल्याचे सांगण्यात आले; पण शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी ही संख्या दीड ते अडीच लाखांपर्यंत पोचते. सण आणि शुभ दिवस यांवेळी दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या अनुमाने ५ लाखांपर्यंत पोचते. मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय अरुंद आहेत. (Mathura Corridor)
(हेही वाचा – Manipur Violence : …तोपर्यंत मणिपूर हिंसाचार सुरूच रहाणार; लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांची स्पष्टोक्ती )
राज्य सरकारला निर्देश
प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीस अनेक अडचणी येत आहेत. अरुंद रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेकदा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. अलीकडे काही लोकांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरते. यानंतरही उत्तरप्रदेश सरकार आणि जिल्हा प्रशासन यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. याप्रकरणी राज्य सरकारला योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, असे आवाहन करण्यात आले होते. (Mathura Corridor)
कसा असेल कॉरिडॉर ?
- यमुनेच्या बाजूने येणारा रस्ता २ सहस्र १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा असेल. या मार्गावरून ये-जा करणार्यांसाठी २ भागांत ‘कॉरिडॉर’ विकसित करण्यात येणार आहे. एक खालचा भाग असेल आणि दुसरा त्याच्या वर अनुमाने ३.५ मीटर असेल, ज्यावर एक उतार बांधला जाईल.
- दोन्ही भागांमध्ये प्रसाधनगृह, सामान ठेवण्याची खोली, पिण्याच्या पाण्याची सुविधा, बाल संगोपन कक्ष, वैद्यकीय व्यवस्था, महनीय व्यक्तींसाठी खोल्या आणि यात्रेकरूंसाठी प्रतीक्षालय बांधण्यात येणार आहे. कॉरिडॉरचा खालचा भाग अनुमाने ५ सहस्र चौरस मीटर, तर वरचा भाग अनुमाने ६५० चौरस मीटर असेल.
- कॉरिडॉरच्या खालच्या भागात अनुमाने ८०० चौरस मीटर परिसरात पूजा साहित्याची दुकाने बांधली जाणार आहेत. कॉरिडॉर करण्यासाठी जी दुकाने पाडली जातील, त्यांना येथे दुकान दिले जाणार आहे.
- यमुना द्रुतगती मार्गावरून (Yamuna Expressway) येणार्या भाविकांसाठी बांके बिहारी पुलाचे वाहनतळ ३७ हजार चौरस मीटरमध्ये सिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ विकसित करण्यात येणार आहे. येथे एकावेळी १ सहस्र ५५० वाहने उभी करणे शक्य होणार आहे. (Mathura Corridor)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community