Kanipakam Vinayaka Mandir : कनिपाकम गावातील विनायक मंदिर भक्तांच्या उद्धाराचे ठिकाण 

243

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेल्या कनिपाकम गावातील गणपती मंदिराविषयी (Kanipakam Vinayaka Mandir) तुम्हाला माहिती आहे का? या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. या मंदिराची स्थापना चोल राजा कुलोथुंगा चोल याने 11व्या शतकाच्या सुरुवातीला केल्याचे सांगितले जाते. तर 1336 मध्ये विजयनगर राजघराण्यातील सम्राटांनी या मंदिराच्या विकासाचे काम पुढे नेले. हे मंदिर गणेशाच्या इतर मंदिरांपेक्षा अगदी वेगळे आणि अद्वितीय आहे. हे एक मंदिर आहे ज्याच्या मध्यभागी एक नदी वाहते आणि येथे एक अतिशय विशाल आणि अद्वितीय अशी गणपतीची मूर्ती आहे जी स्वतःच वाढत राहते. येथे येणाऱ्या भक्ताची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते आणि श्रीगणेश भक्ताच्या पापांचे हरण करतात, असे म्हणतात.

चला तर मग जाणून घेऊया या मंदिरातील खास न ऐकलेल्या गोष्टी 

कानिपकम गणेश मंदिरात (Kanipakam Vinayaka Mandir) भक्त जे मागतात ते नक्कीच मिळते असे येथे जाणारे भाविक सांगतात. अनेक महिलांनी येथे येऊन धन्यता मानली आहे, तर अनेक अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचे वर सापडले आहेत. याशिवाय या मंदिराचे सर्वात मोठे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे सध्या असलेल्या विनायकाच्या मूर्तीचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. हे तुम्हाला विचित्र वाटत असेल पण हे खरे आहे. याचा पुरावा म्हणजे त्याचे पोट आणि गुडघे, ज्याचा आकार दररोज वाढत आहे. असे म्हणतात की विनायकाचे भक्त श्री लक्ष्मम्मा यांनी त्यांना एक कवच भेट दिले होते, परंतु मूर्तीच्या वाढलेल्या आकारामुळे ते मूर्तीवर बसत नाही. या मंदिराचे वैशिष्ट्य एवढेच नाही की येथील गणेशमूर्तीचा आकारही वाढतो. खरे तर या मंदिराच्या मध्यभागी वसलेली नदीही विशेष आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठीही लोकांना परीक्षा द्यावी लागते.

(हेही वाचा Manipur Violence : …तोपर्यंत मणिपूर हिंसाचार सुरूच रहाणार; लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांची स्पष्टोक्ती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.