ICMR Research Corona Vaccine : कोरोना काळातील मृत्यूंचे गूढ कायम; ICMRच्या संशोधनात काय म्हटले आहे ?

आय.सी.एम्.आर्.ने केलेले हे संशोधन १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दीड वर्षाच्या कालावधीत देशभरातील ४७ प्रमुख रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित आहे.

110
Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता
Covishield Vaccine: कोविशिल्ड वॅक्सिनमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका, कंपनीने मान्य केली दुष्परिणामांची शक्यता

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (‘आय.सी.एम्.आर्.’ने ICMR) कोरोना लसीच्या संदर्भात संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा कुठलाही धोका नाही, असे समोर आले आहे. (ICMR Research Corona Vaccine)

(हेही वाचा – Mathura Corridor : आता श्रीकृष्णाच्या मथुरेतही कॉरिडॉर; उच्च न्यायालयाची अनुमती !)

काय आहे अभ्यास ?
  • या अभ्यासानुसार रुग्णालयात भरती केल्यामुळे, तसेच आकस्मिक मृत्यू होण्याचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैलीच्या काही सवयी, यांमुळे कोरोनाकाळात अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.
  • मृत्यूच्या कारणांमध्ये मृत्यूपूर्वी ४८ घंटे सतत दारू पिणे, अमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करणे अथवा मृत्यूच्या ४८ घंटे आधी विविध प्रकारचे तीव्र शारीरिक कष्ट करणे, यांचा समावेश आहे.
  • अहवालात असेही म्हटले आहे की, या लसीचा किमान एक डोस घेतल्यास लोकांमध्ये अशा आकस्मिक मृत्यूचा धोका अल्प होऊ शकतो.

(हेही वाचा – Manipur Violence : …तोपर्यंत मणिपूर हिंसाचार सुरूच रहाणार; लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांची स्पष्टोक्ती )

४७ रुग्णालयांमध्ये दीड वर्ष अभ्यास

आय.सी.एम्.आर्.ने केलेले हे संशोधन १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दीड वर्षाच्या कालावधीत देशभरातील ४७ प्रमुख रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित आहे. १८ ते ४५ वयोगटांतील ७२९ लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. हे लोक निरोगी होते आणि त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता. असे असले, तरीही अज्ञात कारणांमुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला. (ICMR Research Corona Vaccine)

अभ्यासात असे दिसून आले की, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते, त्यांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता अल्प होती, तर ज्यांनी एक डोस घेतला होता, त्यांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता थोडी अधिक होती. (ICMR Research Corona Vaccine)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.