Dance Bar In Marol : मरोळ येथील ‘सरोज पॅलेस’ डान्सबारवर समाजसेवा शाखेची छापेमारी

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असणाऱ्या डान्सबारवर मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून हॉटेल व्यवस्थापनासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

160
Dance Bar In Marol : मरोळ येथील 'सरोज पॅलेस' डान्सबारवर समाजसेवा शाखेची छापेमारी
Dance Bar In Marol : मरोळ येथील 'सरोज पॅलेस' डान्सबारवर समाजसेवा शाखेची छापेमारी

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम सुरू असणाऱ्या डान्सबारवर मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून हॉटेल व्यवस्थापनासह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या छापेमारी दरम्यान बारमध्ये अश्लील नृत्य करताना बारा डान्सर महिला आढळून आल्या. बारा डान्सरवर उधळण करण्यात येणारी हजारो रुपयांची रोकड छापेमारीदरम्यान हस्तगत करून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची सुटका केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अनेक वेळा डान्स बारवर समाजसेवा शाखेकडून कारवाई करून देखील हे डान्सबार पुन्हा सुरू होत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Dance Bar In Marol)

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मरोळ इंडस्ट्रीज या ठिकाणी असलेल्या सरोज पॅलेस बार अँड रेस्टोरंट या ठिकाणी सोमवारी रात्री छापेमारी केली. या छापेदरम्यान सरोज पॅलेस बारमध्ये खुलेआम बारबाला अश्लील डान्स करताना समाजसेवा शाखेच्या पोलिसांना आढळुन आले. या प्रकरणी समाजसेवा शाखेने २० जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मॅनेजर, कॅशिअर, फ्लोर मॅनेजर, मालक आणि ग्राहकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान १० महिलांची सुटका करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व एमआयडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुनाथ वाडी, मरोळ इंडस्ट्रीज या ठिकाणी असलेल्या सरोज पॅलेस बार अँड रेस्टोरंटमध्ये तळमजल्यावरील हॉलमध्ये गायिकांच्या नावाखाली महिलांकडुन विनापरवाना नृत्य करवुन घेत आहे व तसे करण्यास सदर बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, कर्मचारी, ऑर्केस्ट्रा कलाकार आणि अश्लील नृत्य करणाऱ्या बारबालांना प्रोत्साहन देत असल्याची माहिती समाजसेवा शाखेचे स. पो. नि बाळासाहेब कानवडे यांना मिळाली. (Dance Bar In Marol)

(हेही वाचा – Kanipakam Vinayaka Mandir : कनिपाकम गावातील विनायक मंदिर भक्तांच्या उद्धाराचे ठिकाण )

समाजसेवा शाखेने गुप्त बातमीदार पाठवून खात्री करून सोमवारी रात्री पोलीस पथकासह बारवर छापा टाकला. या छापेमारीदरम्यान समाजसेवा शाखेने नृत्य करणाऱ्या बारबालांवर दौलतजादा करणाऱ्या ग्राहकांसह हॉटेल मॅनेजर, वेटर, कॅशिअर आणि ऑर्केस्ट्रा कलाकार आणि बारबालांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी बार मालक, मॅनेजर, वेटर, कॅशिअर आणि ग्राहक असे एकूण २० जणांविरुद्ध कलम १८८, ३४ भा. द. वि सह महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामधील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६ च्या कलम ३,८(१),(२),(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बारबाला, नृत्यांगना आणि गायिका असे एकूण १० महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. समाजसेवा शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार एमआयडिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अनेक वेळा डान्स बार वर कारवाई करण्यात आलेली आहे. (Dance Bar In Marol)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.