Aditya Thackeray : आदित्य ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर, खळा बैठकीतून जनतेशी साधणार संवाद

आमदार आदित्य ठाकरे कोकणवासीयांशी खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत.

147
तो प्रत्येक पालकमंत्र्यांचा अधिकारच, Aditya Thackeray यांनी दिली कबुली

ठाकरे गटाचे शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उद्यापासून म्हणजे गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी दोन दिवस कोकण दौऱ्यावर जाणार असून ते मतदारांना संपर्क साधणार असल्याचे शिवसेना मद्यवर्ती कार्यालयाने कळविले आहे. (Aditya Thackeray)

आमदार आदित्य ठाकरे कोकणवासीयांशी खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात पक्ष वाढीसंदर्भात खळा बैठकीच्या माध्यमातून ते पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोकणातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच ते त्या बैठकांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील. (Aditya Thackeray)

(हेही वाचा – Zero Waste Management : शून्य कचरा व्यवस्थापनासाठी झटणाऱ्या अस्मिता गोखले)

गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दोडामार्ग येथे लीना कुबल यांच्या घरी बैठक होईल. तर दुपारी १२.२५ वाजता सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी आणि दुपारी दीड वाजता कुडाळ येथे मंदार शिरसाट यांच्या घराच्या खळ्यात बैठक होणार आहे. (Aditya Thackeray)

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता कुडाळ बांबार्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराच्या खळ्यामध्ये आदित्य ठाकरे हे सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत, आणि सायंकाळी ४ वाजता कणकवली येथून राजापूरला प्रयाण करतील, असे युवासेनेकडून कळवण्यात आले आहे. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.