उबाठाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी परस्पररित्या डिलाईल रोड पुलाचे उदघाटन केले होते, त्यामुळे महापालिकेने त्यांच्यावर गुन्हा केला, यावरून वादात सापडलेल्या आदित्य ठाकरेंना आता गुरुवार, २२ नोव्हेंबर रोजी शासकीय पातळीवर या पुलाचा उदघाटन सोहळा होणार आहे, त्या सोहळ्यासाठी आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जी/दक्षिण प्रभाग अंतर्गत ना.म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या (Delai Road Bridge) रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर जिल्हा दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते गुरूवारी, 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या समारंभास प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे.
(हेही वाचा Raj Thackeray On Reservation : आरक्षणाच्या वादात पडू नका; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश)
स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार आशीष शेलार यांच्यासह आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. त्यासोबतच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे असतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती असेल.
Join Our WhatsApp Community