Chandrashekhar Bawankule : छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमध्ये खेळतानाचे एक छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित केले.

148
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार; Chandrashekhar Bawankule यांनी व्यक्त केला विश्वास

मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे अशा छायाचित्राच्या आधारावर कोणाला माझी प्रतिमा खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला यामाध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सतत दौरे करावे लागतात. मी महिन्यातून फक्त एकदा घरी जातो. यावेळी माझ्या कुटुंबाने वेळ मागितला आणि तीन दिवस आम्ही हाँगकाँगला गेलो. तिथे कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी कॅसिनो आहेच. त्याला क्रॉस करूनच तुमच्या रूममध्ये किंवा जेवायला जावे लागते. तिथेच कोणीतरी माझे छायाचित्र काढले आणि बदनामीचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी केला. (Chandrashekhar Bawankule)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमध्ये खेळतानाचे एक छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित केले. या छायाचित्रावरून राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला होता. माझ्याकडे असे अजून २७ फोटो आणि ५ व्हिडिओ असल्याचे सांगत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती. बावनकुळे यांनी दीड तासातच साडेतीन कोटी रूपये जुगारावर उधळले असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी आपला खुलासा केला. (Chandrashekhar Bawankule)

(हेही वाचा – Mumbai Water : यंदा पाणीपट्टी दरवाढ रद्द, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने केली घोषणा)

एका छायाचित्राच्या आधारावर माझ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो योग्य नाही. या प्रकरणात मला व्यक्तिगतरित्या आणि राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परदेशात कोणालाही साडेतीन कोटी रूपये असेच नेता येत नाहीत. एक लाख रुपये जरी नेत असाल तरी तीन तीन वेळा तपासणी होते. हाँगकाँगमध्ये माझ्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे मी पैसे उधळण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना या पैशाचा पळवाटा माहिती आहेत त्यांनीच हे आरोप केले, असा पलटवार बावनकुळे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केला. (Chandrashekhar Bawankule)

माणुसकी म्हणून एका फोटोवर थांबलो: संजय राऊत

दरम्यान, एका फोटोवरून कोणाची इमेज खराब करू नये हेच बावनकुळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगावे. ते ज्या पद्धतीने इतरांवर हल्ला करतात ते कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल संजय राऊत यांनी आज केला. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ४०-४५ वर्षे काम केले आहे. आता तुम्हाला कळले असेल की काय होते आणि काय घडते. तरी आमच्यात माणुसकी आहे म्हणून आम्ही एकाच फोटोवर थांबलो आहोत, असेही संजय राऊत म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.