Aditi Tatkare : बाल हक्क आयोगाला सर्वतोपरी सहकार्य करणार; आदिती तटकरे यांची ग्वाही

राज्यात बालधोरण आखण्यात येत असून त्यामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासावर आधारित उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

185
Aditi Tatkare : बाल हक्क आयोगाला सर्वतोपरी सहकार्य करणार; आदिती तटकरे यांची ग्वाही
Aditi Tatkare : बाल हक्क आयोगाला सर्वतोपरी सहकार्य करणार; आदिती तटकरे यांची ग्वाही

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्यामुळे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी आणि आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी दिली. राज्यात बालधोरण आखण्यात येत असून त्यामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासावर आधारित उपक्रम आणि योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात बुधवारी महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट, होप फॉर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “बाल स्नेही” पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना तटकरे यांनी राज्यात बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विकासासाठी सरकार विशेष लक्ष देत आहे. सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा हक्क असून बालसुधार गृह, महिला आणि बालविकास आयुक्तालय, एकात्मिक बालविकास आयुक्तालय यांच्यामार्फत विविध योजना प्राधान्याने राबवत आहोत, असे तटकरे यांनी सांगितले.

तर देशातील बालक सुदृढ तर देश नेहमीच समृद्ध राहील. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून बालकांसाठी सुरु असलेले काम अभिनंदनीय आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. (Aditi Tatkare)

राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य आदी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर काम करणाऱ्या संस्था तसेच अधिकारी या सकारात्मक पद्धतीने कार्य पार पाडत आहेत. अशा व्यक्ती आणि संस्थांना “बाल स्नेही” पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हे काम असेच सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी यावेळी सांगितले. (Aditi Tatkare)

(हेही वाचा – Aaditya Thackeray : परस्पर डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन करणारे आदित्य ठाकरे त्याच पुलाच्या शासकीय उदघाटन कार्यक्रमाला हजेरी लावणार का?)

यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परभणीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल, धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी रागसुधा आर., धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., नाशिकच्या आशिमा मित्तल, चंद्रपूरचे विवेक जॉन्सन, आयुष प्रसाद यांना सन्मानित करण्यात आले. (Aditi Tatkare)

यावेळी महिला आणि बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला आणि अत्याचार) दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक संपर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी राजलक्ष्मी नायर, होप फोर चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला आणि बालविकास उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते. (Aditi Tatkare)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.