आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना नार्वेकरांनी मोठे वक्तव्य केले.
ज्या गतीने सुनावणी सुरू आहे, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. माझ्याकडे सुनावणीसाठी फक्त 16 दिवस आहेत. त्यात या प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे. पण सुनावणी ज्या गतीने पार पडत आहे ते पाहता या प्रकरणाची सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे अवघड आहे, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली. विधानसभा अध्यक्षांसमोर महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना व्हीपशी संबंधित घडामोडींवर प्रश्न विचारले. जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काही उत्तरावर जेठमलानी यांनी आक्षेपही घेतला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि जेठमलानी यांच्यात खडाजंगी झाली. जेठमलानी यांनी विचारलेल्या प्रश्नांवरुन सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे अशा प्रश्नांपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community