Air Pollution Mitigation : बीकेसीतील मेट्रो प्रकल्पाच्या कामाला महापालिकेची स्टॉप वर्क नोटीस

मुंबईत हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने कडक उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शासनाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

163
Air Pollution रोखण्यासाठी महापालिकेने बनवले धोरण; स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्यास आणि शेकोटी करण्यास बंदी

मुंबईत हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने कडक उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात शासनाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेट्रो लाईन २ बच्या मार्गाचे काम करणाऱ्या बीकेसीतील प्रकल्प कामाला महापालिकेच्यावतीने काम थांबवण्यासंदर्भातील नोटीस जारी करण्यात आली आहे. महापालिकेने जारी केलेल्या हवेतील प्रदुषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचे पालन न केल्याने ही नोटीस महापालिकेच्या एच पूर्व विभागाच्यावतीने जारी करण्यात आली आहे. (Air Pollution Mitigation)

मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी २५ ऑक्टोबर २०२३ रोजी हवेतील धुलिकण नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये बांधकामांच्या ठिकाणांकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहे. त्यानुसार महापालिकेने सर्व खासगी विकासकांच्या बांधकामांसह शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामांनाही नोटीस जारी करून हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीच्या उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच ज्या बांधकामांच्या ठिकाणी या उपाययोजना राबवल्या जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही इशारा दिला होता. (Air Pollution Mitigation)

त्यानुसार मेट्रो लाईन २ बी प्रकल्पांतर्गत कामांच्या ठिकाणी अशाप्रकारची उपाययोजना करण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२३ ला नोटीस जारी केल्यानंतरही या नियमांचे पालन होत नसल्याने ४ नोव्हेबर २०२३ रोजी काम थांबवण्यासंदर्भातील नोटीस अर्थात स्टॉप वर्क नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतरही या प्रकल्पांमध्ये प्रदुषणासंदर्भातील प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नसल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने अखेर बुधवारी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी एच-पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांच्यासह बीकेसी जी ब्लॉक येथील या प्रकल्पाच्या घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळीही नियमांचे उल्लंघन होताना दिसल्याने या प्रकल्पाचे कंत्राटदार जे कुमार इन्फ्राप्रोजेक्टचे सहायक महाव्यवस्थापक यांच्या नावे नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये या मेट्रो प्रकल्पाचे काम थांबवण्याचे निर्देश दिले असून जर प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास आपल्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल अशाप्रकारचा इशारा यामध्ये दिला. (Air Pollution Mitigation)

(हेही वाचा – Mumbai Water : यंदा पाणीपट्टी दरवाढ रद्द, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने केली घोषणा)

मुंबईतील ५२७ बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस

मुंबईत सुर असलेल्या इमारतींसह इतर शासकीय पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांच्या बांधकामांमध्ये हवेतील प्रदुषण नियंत्रण आणण्यासाठी आतापर्यंत मुंबईतील ५२७ बांधकामांना स्टॉपवर्क नोटीस महापालिकेच्यावतीने २४ विभागाच्यावतीने जारी करण्यात आले आहेत. तर ४६५ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस जीर करण्यात आल्या आहे. यामध्ये के पूर्व आणि एच पूर्व विभागात सर्वांत जास्त बांधकामांना स्टॉप वर्क नोटीस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. (Air Pollution Mitigation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.