Contractual Nurses : महापालिका रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ कंत्राटी सहायक परिचारिकांची भरती

महापालिकेच्यावतीने प्रशिक्षकांची कंत्राटी नेमणूक

236
Contractual Nurses : महापालिका रुग्णालयांमध्ये 'इतक्या' कंत्राटी सहायक परिचारिकांची भरती
Contractual Nurses : महापालिका रुग्णालयांमध्ये 'इतक्या' कंत्राटी सहायक परिचारिकांची भरती

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत ४२१ नवीन सहायक परिचारिका प्रसविकांची भरती प्रक्रिया रखडली असून तोपर्यंत रुग्णालयांमध्ये जाणवणारी गैरसोय दूर करण्यासाठी नजिकच्या काळामध्ये ४२१ सहायक परिचारिका प्रसविकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे नव्याने भरती होणाऱ्या आणि कंत्राटी तत्वावर होणाऱ्या सहायक परिचारिकांसह आशा सेविकांना महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील सेवा निवृत्तपरिचारिकांकडून प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (Contractual Nurses)

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सध्या सहायक परिचारिकांची ४२१ पदे रिक्त असून या पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने महापालिकेने ४२१ सहायक परिचारिकांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. (Contractual Nurses)

या सहायक परिचारिका प्रसविकांना तसेच आशा सेविका, नव्याने भरती करण्यात येणाऱ्या सहायक परिचारिकांना योग्य प्रशिक्षण युध्दपातळीवर देण्यासाठी तसेच सेवेत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करता प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठी महापालिका व राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका तथा सहायक परिचारिका प्रसविका यांना कंत्राटी तत्वावर प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येणार आहे. (Contractual Nurses)

(हेही वाचा – Agriculture News : बोगस बियाणे विरोधातील कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही; धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण)

महापालिकेच्यावतीने अशाप्रकारे कंत्राटी तत्वावर ३२ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. एक वर्षांकरता या प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मासिक २५ हजार रुपयांचे मानधन या प्रत्येक प्रशिक्षकांना दिले जाणार आहे. ही नेमणूक सहा सहा महिन्यांकरता असेल. (Contractual Nurses)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.