MSRTC : एसटीच्या ताफ्यात ‘इतक्या’ बसेस होणार दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ४९५ नव्या बसेस दाखल होणार आहेत, या प्रक्रियेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मंजुरी दिली.

156
MSRTC : एसटीच्या ताफ्यात 'इतक्या' बसेस होणार दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी
MSRTC : एसटीच्या ताफ्यात 'इतक्या' बसेस होणार दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ४९५ नव्या बसेस दाखल होणार आहेत, या प्रक्रियेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) मंजुरी दिली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश एसटी महामंडळाला दिले. बसस्थानाकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरामोहरा बदलावा, अशी सूचनाही त्यांनी केली. (MSRTC)

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ३०३ वी संचालक मंडळ बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या अनेक प्रस्तावना मान्यता देण्यात आली. एसटी महामंडळाला २० नोव्हेंबर या एकाच दिवशी ३६.७३ कोटी रुपये विक्रमी उत्पन्न झाल्याबद्दल शिंदे यांनी महामंडळाचे अभिनंदन केले. राज्यातील सामान्य नागरिकांना एसटीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत २ हजार २०० साध्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामुळे २ हजर २०० तयार परिवर्तन साध्या बसेस मार्च २०२४ अखेर एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. याबरोबरच एसटीच्या २१ वेगवेगळ्या विभागांसाठी १ हजार २९५ साध्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. (MSRTC)

राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याच्या निर्णयाला तातडीने मंजुरी देतानाच शिंदे यांनी महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक बसस्थानकावर एक स्टॉल देण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (MSRTC)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप)

राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांवर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. एसटीतर्फे येत्या दोन वर्षांत ५ हजार १५० ई-बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. जिल्हा आणि तालुकास्तरावर त्यांची सेवा देण्यात येणार आहे. या बससेवेकरिता सामान्यांना परवडेल असेच तिकीट दर ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. (MSRTC)

यावेळी परदेशी शिक्षण अग्रीम योजना, धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान याबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आरोग्य तपासणी योजनेत महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणीचा समावेश करण्याची सूचनाही शिंदे यांनी केली. बसस्थानकांवरील होर्डिंग्जची दुरुस्ती करतानाच त्यांची सजावट करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. (MSRTC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.