एका मुलाखतीत नीरद चौधरी (Nirad Chandra Chaudhuri) यांनी सांगितले होते की, एके रात्री त्यांना प्रश्न पडला होता की, मी फक्त मरण्यासाठीच जन्माला आलो आहे का? मला माझ्या आवडत्या विषयावर, इतिहासावर कधीच लिहिता येणार नाही का? ते म्हणतात की त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीने सांगितले की, त्यांनी आयुष्यात जे पाहिले, अनुभवले तोही इतिहास आहे आणि तो लिहिताही येतो. यातूनच ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अननोन इंडियन’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
नीरद चंद्र चौधरी (Nirad Chandra Chaudhuri) यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८९७ रोजी पूर्व बंगालच्या (आजचा बांगलादेश) किशोरगंज येथे झाला. त्यांचे वकील वडील होते तर आई निरक्षर होती. नीरद चंद्र चौधरी यांचा शेक्सपियर आणि संस्कृत शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास होता. ते भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचे प्रशंसक होते.
(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींवर टीका; भाजपची राहुल गांधी, खरगेंच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार)
ते ब्रिटिश साम्राज्याचे प्रशंसक होते. म्हणूनच लोक त्यांच्यावर टीका करत. त्यांनी आपले पुस्तक ब्रिटिश साम्राज्याला समर्पित केले होते. ब्रिटिशांमुळे आपली प्रगती झाली आहे यावर त्यांचा विश्वास होता. नीरद चंद्र चौधरी (Nirad Chandra Chaudhuri) यांना ‘शेवटचे ब्रिटिश साम्राज्यवादी’ म्हटले जायचे. त्यांच्या कार्यावर सातत्याने टीका झाली आणि त्यांना भारताच्या साहित्य विश्वातून हद्दपार करण्यात आले. १९७० च्या दशकात ते इंग्लंडला निघून गेले आणि ऑक्सफर्डमध्ये स्थायिक झाले.
इंग्रजांनी त्यांना ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयात मानद डॉक्टरेट उपाधी दिली. राणीने त्यांना मानद सी.बी.ई प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. थ्री हॉर्समेन ऑफ द न्यू एपोकॅलिप्स, टू लिव्ह ऑर नॉट टू लिव्ह, द इंटलेक्च्युअल इन इंडिया, अ पॅसेज ऑफ इग्लंड ही त्यांची महत्वाची पुस्तके आहेत. १ ऑगस्ट १९९९ मध्ये ऑक्सफोड, इंग्लंड येथे त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community