गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये काही प्रमाणात ढगाळलेले वातावरण झालेले पाहावयास मिळाले. तर आठवड्याच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर परिसरात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र गुरुवारपासून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शुक्रवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी याची व्यापकता अधिक असेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. (Weather Update)
गुरुवारी कार्तिकी एकादशी झाल्यानंतर शुक्रवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी तुळशी विवाहाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली येथे गुरुवारपासूनच मेघगर्जनेसह एक-दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव येथेही पावसाची शक्यता आहे. (Weather Update)
(हेही वाचा : Mhada : म्हाडा देणार ‘त्या’ ‘सदनिका भाडे तत्वावर ?)
या ठिकाणी शनिवार-रविवार पावसाचा अंदाज
प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित विभागांमध्ये शनिवार, रविवारी पाऊस पडू शकेल. शनिवार आणि रविवारी यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचाही समावेश होऊ शकतो. परभणी, हिंगोली, नांदेड येथे हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना मात्र यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community