IND vs AUS 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी -२० मालिकेला आजपासून सुरवात

209
IND vs AUS 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी -२० मालिकेला आजपासून सुरवात

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS 1st T20I) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका होणार असून आज म्हणजेच गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी पहिला सामना खेळला जाणार आहे.

विशाखापट्टणमच्या मैदानात ही मॅच होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग ११, आणि पिच रिपोर्ट बद्दल जाणून घेऊ.

(हेही वाचा – AUSTRAHIND-23 : भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना; संयुक्त लष्करी सराव करणार)

ऑस्ट्रेलियाविरोधात (IND vs AUS 1st T20I) होत असलेल्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या तीन सामन्यांसाठी, भारतीय संघात फक्त दोनच खेळाडू असतील जे 2023 च्या विश्वचषकाचा भाग होते, ज्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश आहे. प्रसिध कृष्णाने विश्वचषकातील एकही सामना खेळला नाही. मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर संघात सामील होणार आहे. अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पिच रिपोर्ट

विशाखापट्टणममधील (IND vs AUS 1st T20I) राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही सारखीच मदत मिळते. त्यामुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांनाही खेळपट्टी मदत होईल. त्याशिवाय या मैदानावर धावांचा पाठलाग करणे चांगले आहे, कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 67 टक्के सामने जिंकले आहेत.

(हेही वाचा – K.E.M Hospital : के.ई.एम रूग्णालयात हेल्प डेस्क आणि अस्थिव्यंग अत्याधुनिक शल्यक्रियागारचे गुरुवारी लोकार्पण)

भारताची संभाव्य प्लेईंग 11

सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, शिवम दुबे/यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, अक्षर पटेल/वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार. (IND vs AUS 1st T20I)

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11

स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, जोश इंगलिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडोर्फ, तनवीर सांघा. (IND vs AUS 1st T20I)

(हेही वाचा – NIA Raids : पंजाब, हरियाणात ‘एनआयए’चे छापे; अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास हल्ला)

विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि बंगळुरू येथे होणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरु होतील. (IND vs AUS 1st T20I)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.