Tomato Prices : टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ; किरकोळ बाजारात ६० रुपये प्रतिकिलो

गेल्या दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घटली

179
Tomato Prices : टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ; किरकोळ बाजारात ६० रुपये प्रतिकिलो

टोमॅटोच्या दरात (Tomato Prices) पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांपासून भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण या भाज्यांचे दरही किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वधारले आहेत.

भाज्यांची आवक घटली

पुणे, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतून मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील बाजारपेठेत भाज्यांची आवक होते. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे (Tomato Prices) घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रतिकिलो २ ते १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण भाज्यांचा समावेश आहे. किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांनी वधारले असून, या सर्व भाज्या किलोमागे ६० ते ८० रुपयांवर पोहोचल्या आहेत. (Tomato Prices)

(हेही वाचा – Mumbai Fire : भायखळ्याच्या म्हाडा इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही)

टोमॅटो दरातील चढ-उतार

मे – ३० प्रति किलो

जून – ८०-१०० प्रति किलो

जुलै – १८०-२०० प्रति किलो

ऑगस्ट मध्य – १६०-२०० प्रति किलो

ऑगस्ट अखेर – ८०-१२० ;प्रति किलो

सप्टेंबर – २०-३० प्रति किलो

ऑक्टोबर – २५-३५ प्रति किलो

२२ नोव्हेंबर – ५० ते ६० प्रति किलो

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.