पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील नीरा भीमा बोगद्याच्या शाफ्ट क्रमांक चारमध्ये विद्युत पंपाची पाहणी करताना २७४ फूट खोल बोगद्यात पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. रतिलाल बलभीम नरुटे (वय ५०) व अनिल बापूराव नरुटे (वय ३५) अशी त्यांची नावे आहेत. ते काझडचे (ता. इंदापूर) रहिवासी आहेत. बुधवारी (22 नोव्हेंबर)रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Inadapur Tunnel Accident)
इंदापूर तालुक्यातील कझार गावाजवळ हा अपघात झाला. भादलवाडी ते तावशीदरम्यान नीरा आणि भीमा नद्यांना जोडण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. अनिल नरुटे व रतीलाल नरुटे हे शेतकरी या बोगद्यात उतरले होते. दोघांनाही आपल्या शेतात बोगद्याद्वारे विद्युत पंपाने पाणी द्यायचे होते.म्हणून ते बोगद्यात उतरले. (Inadapur Tunnel Accident)
(हेही वाचा : National Herald Case : गांधी घराण्याला त्यांच्या पापांची किंमत मोजावी लागेल;भाजपाची टीका)
बोगद्यात उतरताना शेतकऱ्याचा तोल गेला
दोन्ही शेतकरी बोगद्यात शिरल्यावर त्यांचा तोल गेला आणि ते आत पडले. लोकांना या घटनेची माहिती मिळताच बोगद्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांशी तातडीने संपर्क साधण्यात आला. यानंतर घटनास्थळी मोठी क्रेन पाचारण करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. क्रेनच्या साहाय्याने सुरुवातीला पाळणा मोकळा सोडण्यात आला व पुन्हा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी पाळणा थोडा तिरका होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाळणा पुन्हा बांधून सोडण्यात आला. राहुल नरुटे, हनुमंत वीर, रणजित नरुटे हे तीन स्थानिक युवक क्रेनच्या साहाय्याने मदत कार्यासाठी बोगद्यामध्ये गेले होते. ((Inadapur Tunnel Accident)
बोगदा सुमारे २३ किलोमीटरचा
हा बोगदा सुमारे २३ किलोमीटर अंतराचा असून याद्वारे मराठवाड्याला पाणी नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. १९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून ज्या ठिकाणी अपघात घडला आहे तेथील काम तीन वर्षांपूर्वीच संपलेले आहे.या परिसरात शेतकरी बोगद्यात उतरत असतात. त्यांना उतरू नये यासाठी बांधकाम उपविभाग क्रमांक तीन बारामती यांनी मे २०२३ मध्ये लेखी आवाहन केले होते. त्याकडे शेतकरी दुर्लक्ष करीत असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community