Gutkha Seized : मुंबई, नवी मुंबईमधून लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त

११ जणांना अटक

138
Gutkha Seized : मुंबई, नवी मुंबईमधून लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशनानुसार अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी (२१ नोव्हेंबर) मुंबईतील बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त (Gutkha Seized) केला असून याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा (Gutkha Seized) व पान मसालाची बेकायदा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुंबई व नवी मुंबई शहरामध्ये धडक मोहीम हाती घेतली.

(हेही वाचा – Mumbai Fire : भायखळ्याच्या म्हाडा इमारतीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही)

८१ हजार ७८ रुपयांचा पान मसाला जप्त

जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरातील ओशिवरा सुपारी स्टोरवर केलेल्या (Gutkha Seized) कारवाईमध्ये तब्बल ८१ हजार ७८ रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. तसेच तपासणीसाठी तीन नमुने घेण्यात आले. प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दुकानाचा मालक मोहम्मद अली इर्शाद अहमद शेख याला अटक करण्यात आली.

बोरिवली गोकुळ पान शॉपवर कारवाई

तसेच बोरिवली पश्चिमेकडील (Gutkha Seized) चामुंडा सर्कलजवळील गिरिजा स्टोर आणि रोकडिया लेन येथील गोकुळ पान शॉपवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ हजार १९६ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. यातील १२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या दोन्ही दुकानाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – National Herald Case : गांधी घराण्याला त्यांच्या पापांची किंमत मोजावी लागेल;भाजपाची टीका)

परळ एस. टी आगराजवळील दुबे पान शॉपवर कारवाई

त्याचप्रमाणे परळ एस. टी आगराजवळील दुबे पान शॉप (Gutkha Seized) आणि दादर पश्चिम येथील बी. एस. रोडवरील किरण पान बिडी शॉपवर कारवाई करण्यात आली. या दुकानांतून ९ हजार १४२ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करून २० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

दुकान मालकांविरोधत गुन्हा दाखल

मुलुंड पश्चिम येथील महाकाली पान शॉप, साई पान शॉप, (Gutkha Seized) शीव पान शॉप, साची पान शॉप, रानु उपाध्याय पान बिडी शॉप आणि राजेश जेठालाल हॅण्डक्राट या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. या दुकानांमधून २८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच ८ हजार ४ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच सहाही दुकान मालकांविरोधत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील पान टपऱ्यांवर कारवाई

तसेच नवी मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील (Gutkha Seized) पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुकानात सापडलेला हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, या टपऱ्याही सील करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – Inadapur Tunnel Accident: इंदापूर तालुक्यात बोगद्यात पडलेल्या दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू)

अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. (Gutkha Seized)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.