IRCTC Down : भारतीय रेल्वेची ऑनलाईन तिकिट बुकिंग करणारी IRCTC ची साइट ठप्प पडली आहे. त्यामुळे IRCTC च्या बेवसाइटची सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे तिकिट बुक करण्यात समस्या येत आहे, असे आयआरसीटीसीने ट्विट केले आहे.
तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. त्यानंतर सेवा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे, असं कंपनीच्या (IRCTC) ट्विटमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा – Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक)
विशेष म्हणजे २२ नोव्हेंबर रोजी डिसेंबरमधील सुट्ट्यांच्या काळात सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांचे बुकींग चालू झाले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी साईट ठप्प झाल्याने प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. इतर वेळीही IRCTC वेबसाइटला सातत्याने अडचणी येत असतात. त्यामुळेही अनेकांनी ट्विटरवरुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘आयआरसीटीसीकडून लवकरच वेबसाइट सुरु करण्यात येईल’, असे सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारण शोधण्याचे काम टीमकडून करण्यात येत आहे, असे सांगण्यात येत आहे.
E- ticket booking is temporarily affected due to technical reasons. Technical team is working on it and booking will made available soon.
— IRCTC (@IRCTCofficial) November 23, 2023
आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा कधी पूर्ववत होईल, हे मात्र अद्याप सांगण्यात आले नाही. देशातील अनेक भागातील लोकांना ही समस्या येत आहे. एका युजर्सने दिलेल्या कमेंटमध्ये त्याने म्हटलं आहे की, हा इश्यू सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे. पेमेंट करण्यास अडचणी येत आहे. पेमेंट केल्यानंतरही पैसे कट केले जातात. IRCTC चे पेज रिडायरेक्टवर एरर येत होते.
हेही पहा –