NCP Crisis : ‘हे’ नेते वगळता राष्ट्रवादीच्या अन्य खासदारांचे सदस्यत्व रद्द करावे

अजित पवार गटाची लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे मागणी

101
NCP Crisis : 'हे' नेते वगळता राष्ट्रवादीच्या अन्य खासदारांचे सदस्यत्व रद्द करावे

एकीकडे शरद पवार गटाने अजित पवार गटाचे (NCP Crisis) राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा, अशी मागणी राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावे वगळण्यात आली आहेत.

आमदार अपात्रता प्रकरण

राज्याच्या राजकारणात मागील दोन वर्षांच्या कालावधीत (NCP Crisis) अभूतपूर्व अशा घटना घडल्या. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले. त्यामुळे पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांविरोधात आक्रमक (NCP Crisis) होताना दिसत आहेत.

(हेही वाचा – Israel-Palestine Conflict : हमासने रुग्णालयाच्या तळाशी बांधले भुयार; इस्रायल लष्कराने जारी केला व्हिडीओ)

सदस्यत्व रद्द करावे

शरद पवार गटाने अजित पवार गटाचे (NCP Crisis) राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात सभापतींना एक पत्र दिले आहे. यात प्रफुल्ल पटेल यांनी चार महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील ती अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने सभापतींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांची उपस्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान, तसेच लोकसभेत सुप्रिया सुळे, (NCP Crisis) अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचे सदस्यत्व रद्द करावीत, अशी मागणी अजित पवार गटाकडून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे करण्यात आली आहे.

(हेही वाचा – कोविड काळातील ४ हजार कोटींच्या खर्चाचा तपशील BMC कडे नाही)

शिंदे गटाचाच पायंडा अजित पवार गटाकडून (NCP Crisis) पुढे नेला जात असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार आणि खासदार यांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावे वगळली होती. तीच भूमिका आता अजित पवार गटाने घेतली असून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं वगळली आहेत. (NCP Crisis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.