Children Midday Meal : मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरणार

योग्य वेळी योग्य सुविधा मिळणे हा मुलांना हक्क आहे. तो त्यांना मिळालाच हवा. तसेच माध्यान्ह भोजनात मुले काय खातात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

243
Children Midday Meal : मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरणार
Children Midday Meal : मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरणार

योग्य वेळी योग्य सुविधा मिळणे हा मुलांना हक्क आहे. तो त्यांना मिळालाच हवा. तसेच माध्यान्ह भोजनात मुले काय खातात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठीही शिक्षण विभागाकडून अभ्यासू शेफ आणि आहारतज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. लवकरच ही समिती मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरविणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. (Children Midday Meal)

शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) व इंडियन पेडट्रिशिअन असोसिएशन (IPA) यांच्या सहकार्यातून ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ या मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. गुरुवारी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील सभागृहात हे शिबिर पार पडले. यावेळी व्यासपीठावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या संचालक प्रिती चौधरी, इंडियन अकॅडमी ऑफ पेडट्रिशिअनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजावडेकर, उप आयुक्त (परिमंडळ २ तथा शिक्षण) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (आरोग्य) संजय कुऱहाडे, आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शहा, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी उपस्थित होते. (Children Midday Meal)

शैक्षणिक आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासह वेगवेगळे तंत्रज्ञान, निरनिराळे खेळ, योगा, व्यायाम आदींवरही भर देणे गरजेचे आहे. शाळा व्यवस्थापनानेही मुलांच्या बौद्धीक विकासासह त्यांच्या शारीरिक विकासाकडेही लक्ष द्यायला हवे. त्यासाठी मुलांना सकस आणि पौष्टीक आहार मिळतो की नाही, याबाबतही विचार करायला हवा. कारण मुले सक्षम तर देश सक्षम होईल, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी मुलांच्या आयुष्यातील आहाराचे महत्त्व विषद केले. आपली शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आहे. तसेच शाळांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचाही योग्य वापर करायला हवा. मुलांचा सर्वांगिण विकास हा शालेय जिवनात होतो. त्यामुळे मुलांना शिक्षणासह, आरोग्य, क्रीडा आदी सुविधा उपलब्ध करून द्या, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (Children Midday Meal)

योग्य वेळी योग्य सुविधा मिळणे हा मुलांना हक्क आहे. तो त्यांना मिळालाच हवा. तसेच माध्यान्ह भोजनात मुले काय खातात, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी देखील शिक्षण विभागाकडून अभ्यासू शेफ आणि आहारतज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. लवकरच ही समिती मुलांच्या माध्यान्ह आहाराचाही मेन्यू ठरविणार आहे. तसेच शाळांच्या टेरेस गार्डनवर पिकवलेल्या फळभाज्यांचे सलाड मुलांना मध्यान्न भोजनाद्वारे देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे शाळांमध्ये मुलांना आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर कशी ठेवता येईल तसेच फटाक्यांबाबतही शिक्षकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे, असल्याचे केसरकर म्हणाले. (Children Midday Meal)

(हेही वाचा – Mumbai Crime : माझगाव येथील गोळीबार गुटखा व्यवसायातून, एकाला अटक)

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ म्हणाले, देशाची येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ व्हावी, यासाठी आज मुलांच्या आहारावर लक्ष केंद्रीत करायला हवे. ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ’ कार्यक्रम घेण्यामागे हाच उद्देश आहे. मुलांनी फास्ट फुडपासून दूर राहावे, याबाबतही या शिबिरात माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘संकल्प स्वस्थ जीवनशैलीचा’ या माहिती पुस्तिकेचे, तसेच ‘द येलो बुक’चे प्रकाशन करण्यात आले. (Children Midday Meal)

दुपारच्या सत्रात डॉ. उपेंद्र किंजावडेकर, महानगरपालिकेचे डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील ८ ते १३ वर्षे वयोगटातील विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रमाचे यू-ट्यूबच्या माध्यमातूनही थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यात १३०० शाळांमधील २६ हजार विद्यार्थी आणि ३ हजार ७०० शिक्षक सहभागी झाल्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले. (Children Midday Meal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.