MLA Disqualification Case : सुनील प्रभूंनी व्हीप पाठवलाच नव्हता; महेश जेठमलानींचा थेट आरोप 

119

आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) मुद्यावर गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु होताच, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पुन्हा एकदा व्हिपचाच मुद्दा उपस्थित करत प्रभू यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी जेठमलानी यांनी प्रभूंनी काढलेला व्हीप खोटा होता, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले जेठमलानी? 

  • ठाकरेंचे प्रतोद प्रभू यांनी व्हिपची खोटी कागदपत्रे सादर केली. व्हिपचा असा कोणताही मेसेज प्रभू यांनी पाठवला नाही.
  • सुनील प्रभू यांनी व्हिपचा मेसेज मनोज चौगुले या व्यक्तीच्या मोबाईलवरून पाठवल्याचे सांगितले. मग चौगुले यांचा मोबाईल रेकॉर्डवर का घेतला नाही?
  • मनोज चौगुले यांचा या ठिकाणी साक्षीदार म्हणून उल्लेख का नाही? त्यामुळे व्हिपचा मेसेज कोणत्याही आमदाराला पाठवला नसल्याचे स्पष्ट होते.

(हेही वाचा Israel-Palestine Conflict : हमासने रुग्णालयाच्या तळाशी बांधले भुयार; इस्रायल लष्कराने जारी केला व्हिडीओ)

काय म्हणाले सुनील प्रभू?

जेठमलानी यांचा आरोप खोटा आहे. ते शाब्दिक छल करत आहेत. व्हिपचा मेसेज मी पाठवला होता. संविधानाची शपथ घेऊन सांगतो.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष? 

दोन्ही गटाचे वकील वैयक्तिक पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे सुनावणीच्या महत्वाचा वेळ वाया जात आहे. मला ही सुनावणी वेळेत पूर्ण करायची आहे. जर तुमच्यामुळे सुनावणी लांबत असेल तर मला तसे सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.