काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थान येथे प्रचारसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांना पनौती असे म्हटले. विश्व चषक सामना पाहण्यासाठी मोदी गुजरातला गेले, त्यामुळे भारत सामना हरला, असे राहुल गांधी म्हणाले. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून त्यांना २ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
(हेही वाचा MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष १८ दिवसांतच सुनावणी आटोपणार)
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. भाजपकडूनही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यात येत होते. आता निवडणूक आयोगाकडूनही कारवाईची भूमिका घेण्यात आली. यावर राहुल गांधी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
Join Our WhatsApp Community