राज्य शासनातील (Maharashtra Government) सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात, राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली ६ नोव्हेंबर २०२३ रोजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबर २०२३ रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकांत केंद्राप्रमाणे १ जुलै २०२३ पासून ४ टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी अधिकारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर सत्वर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्य सचिव यांनी संबंधितांना दिले होते. त्यास अनुसरुन, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२३ पासून ४ टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. ही वाढ जुलै ते ऑक्टोबर २०२३ या चार महिन्यांच्या थकबाकीसह नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे.
(हेही वाचा Israel-Palestine Conflict : हमासने रुग्णालयाच्या तळाशी बांधले भुयार; इस्रायल लष्कराने जारी केला व्हिडीओ)
Join Our WhatsApp Community