Viksit Bharat Sankalp Yatra : गरजूंना वस्तूंचे वाटप; विकसित भारत संकल्प यात्रेला रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा

249
Viksit Bharat Sankalp Yatra : गरजूंना वस्तूंचे वाटप; विकसित भारत संकल्प यात्रेला रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा
Viksit Bharat Sankalp Yatra : गरजूंना वस्तूंचे वाटप; विकसित भारत संकल्प यात्रेला रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये दाखवला हिरवा झेंडा

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाशिक जिल्ह्यातल्या जुनी बेज ग्रामपंचायत येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. (Viksit Bharat Sankalp Yatra) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंडच्या खुंटी येथून विकसित भारत यात्रेची सुरुवात केली होती. या महासंपर्क मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना 100 टक्के पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Marathi Signboards : येत्या मंगळवारपासून मुंबईतील सुमारे पाच हजार दुकानांवर कारवाई)

नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणार

केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या वेळी IEC प्रचार रथासह पारंपारिक वेशभूषा परिधान करीत स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व लहान मुले उत्साहाने सहभागी झाले. 21 लाभार्थ्यांना या वेळी लाभाचे वाटप करण्यात आले. (Viksit Bharat Sankalp Yatra)

सर्वप्रथम आदिवासी जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीरित्या राबविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील नागरिकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखवला हिरवा झेंडा

या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित ‘भारत संकल्प यात्रा योजने’च्या रथाला आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. विकसित भारत संकल्प यात्रा योजनेचे रथ रायगड जिल्ह्यातील अलीबाग, पनवेल, खालापूर, रोहा, तळा, श्रीवर्धन, महाड या सात तालुक्यांमध्ये जाणार आहेत.

केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय आणि पुणे जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा आज पुण्यात शुभारंभ झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यात्रेतील संकल्प रथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. (Viksit Bharat Sankalp Yatra)

जिल्हाधिकारी देशमुख यांनी केली चित्ररथाची पाहणी

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय नलवडे, केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख, प्रबंधक डॉ. जितेंद्र पानपाटील, प्रसिद्धी अधिकारी हर्षल आकुडे, प्रसिद्धी साहायक विकास तापकीर आदी उपस्थित होते.

पुण्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. देशमुख यांनी चित्ररथाची पाहणी करून मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

12 एलईडी चित्ररथ चालवणार

पुणे जिल्ह्यातीत सर्व तालुक्यातील एकूण 1 हजार 843 गावे आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचे 12 एलईडी चित्ररथ चालवण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात आंबेगाव आणि बारामती या तालुक्यातून करण्यात येत असून पुढे दररोज प्रत्येक तालुक्यातील 2 गावी सकाळी आणि संध्याकाळी हे चित्ररथ जाणार आहेत. (Viksit Bharat Sankalp Yatra)

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही पुढील 2 महिने सुरु राहणार असून येत्या 26 जानेवारी 2024 रोजी यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.