Mumbai Water Pipeline : मुंबईबाहेरील जलवाहिनींभोवती सीसीटीव्ही कॅमेरांसोबतच आता वॉच टॉवरही

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या बाहेरील भागात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसवण्यचा निर्णय घेतला असून या सी.सी. टिव्ही कॅमेरांसोबतच आता जलवाहिनींभोवती टेळकणी स्तंभ अर्थात वॉच टॉवर उभारण्याचाही निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

169
Water Pipe Lines : भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 'त्या' दोन्ही जलवाहिन्यांची ठाण्याला होते अडचण

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींच्या सुरक्षेसाठी मुंबईच्या बाहेरील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यचा निर्णय घेतला असून या सीसीटीव्ही कॅमेरांसोबतच आता जलवाहिनींभोवती टेळकणी स्तंभ अर्थात वॉच टॉवर उभारण्याचाही निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या बाहेरील भागांमधून जाणाऱ्या जलवाहिनींसभोवतील अशाप्रकारचे वॉच टॉवर उभारले जाणार आहे. (Mumbai Water Pipeline)

मुंबई शहरास दररोज सुमारे ३९५० द. ल. लि. पाणी पुरवठा केला जात असून सुमारे १०० किलो मीटर लांब अंतरावरुन धरणांमधून हे पाणी मुंबईला वाहून आणले जाते. त्यातील ८० किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी व सेवा रस्ते हे मुंबईच्या बाहेरील भागात आहेत. धरणांपासून ते मुंबईपर्यंतच्या जलवाहिनी लगतच्या सुमारे १०० किमी लांबीचे सेवा रस्ते आहेत. या सर्व सेवा रस्त्यांसह जलवाहिनींची देखभाल व दुरुस्ती ही महापालिकेच्यावतीने केली जात आहे. (Mumbai Water Pipeline)

मात्र, महापालिकेच्या या जलवाहिनींची जंगल परिसरात असून दर १५ किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने प्रेशर मॉनिटरींग केले जात असून त्याठिकाणी ही प्रेशर मॉनिटरिंग चौकी असते. त्यामुळे या जलवाहिनींच्या सभोवती गस्त घालून जलवाहिनीतील पाण्याचा दाब तपासून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जंगल परिसरातून या जलवाहिनी जात असल्याने त्यासर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणे शक्य नसल्याने या प्रेशर मॉनिटरिंग चौकीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून याचठिकाणी टेहळणी स्तंभ अर्थात वॉच टॉवर बसवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Water Pipeline)

(हेही वाचा – MMRC : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ‘टनेलिंग प्रोजेक्ट ऑफ दि इअर’ आणि ‘सेफ्टी इनिशिएटिव्ह ऑफ दि इअर’ पुरस्कार)

जलवाहिन्यांच्या मेंटनन्स चौक्या इत्यादींची दैनंदिन देखरेख, सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणीकरिता रस्ते तसेच मुख्य जलवाहिन्यालगत सीसीटीव्ही सर्वेलिअन्स यंत्रणेसोबतच टेहळणी स्तंभाची उभारणी करणे आवश्यक असल्याने या कामासाठी फ्रेमस्ट्रक्ट कन्सल्टींग इंजिनीअर्स एलएलपी यांची नेमणुक करण्यात आली आहे. नवीन टेहळणी स्तंभाच्या पायाचे बांधकाम करण्यापूर्वी जमिनीतील मातीची तपासणी करण्यात येणार आहे. या तांत्रिक सल्लागाराच्या अहवालानुसार सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवले जावे तसेच टेहळणी स्तंभ कुठे बसवले जावेत याचा पुढील निर्णय घेत कार्यवाही केली जाणार असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. (Mumbai Water Pipeline)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.