छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायानाक भंडारी यांच्या अतुल्य पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे (Exhibition of weapons) आयोजन करण्यात आले आहे. आरमार दिनाचे औचित्य साधून हे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे देवेज्ञ सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज महासंघ, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि दुर्गराज रायगड संस्था यांचे सहकार्य लाभले.
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायानाक भंडारी यांच्या अतुल्य पराक्रमाच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. निलेश सकट यांनी संकलन केलेल्या शिवकालीन शस्त्रांचे हे भव्य प्रदर्शन (Exhibition of weapons) आहे. २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाला अधिकाधिक शिवप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
(हेही वाचा Urban Naxal : राजकीय पक्षांमध्ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी अराजकतेची चाहूल)
Join Our WhatsApp Community