Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास घटला

बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुंबई शहरात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे, परंतु या गुन्ह्याच्या तपासात घट झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आले आहे.

164
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास घटला
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास घटला

बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुंबई शहरात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे, परंतु या गुन्ह्याच्या तपासात घट झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्याच्या तपासात घट आढळून येत असून मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये २२ टक्के घट असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात म्हटले आहे. (Mumbai Police)

मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२३” हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल गुरुवारी (२३ नोव्हेंबर) प्रकाशित झाला आहे. मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी तसेच गुन्ह्याचा तपास याचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. मुंबईतील वाढत्या गुन्ह्याची वास्तविकता बघता याची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे. बालकांविरुद्धचे लैंगिक गुन्हे (पोक्सो) आणि सायबर गुन्हे यांचे वाढते चिंताजनक प्रमाण, फोरेन्सिक विभाग आणि पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ या मुद्यांची तपशीलवार या अहवालात मांडण्यात आलेला आहे. (Mumbai Police)

मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थे समोर अनेक आव्हाने आहेत, शिवाय मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढही होत असल्याची चिंताजनक बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१३ ते २०२३ या दहा वर्षात कालावधीत गेल्या १० वर्षात बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये १३० टक्के ने वाढ झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज दाखल झालेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के गुन्हे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या आहेत. या गुन्ह्यामध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (POCSO) अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत ही अधिकृत माहिती मुंबई पोलीसांच्या वेबसाईटवर दिलेली आहे, असे प्रजा फाऊंडेशनच्या संशोधन व विश्लेषण विभागाचे प्रमुख योगेश मिश्रा यांनी सांगितले. (Mumbai Police)

मुंबई शहरात एकीकडे गुन्ह्यात वाढ होत असून या गुन्ह्याचा तपास मात्र घटलेला आहे, मुंबई पोलीस दलात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्याचा तपासात घट दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून मुंबईच्या पोलीस दलात ३० टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे (ही आकडेवारी जुलै २०२३ पर्यंतची आहे). तर गुन्ह्यांच्या तपासकार्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी पदावरील (पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षण, पोलीस उप-निरीक्षक) मनुष्यबळाची २२ टक्के कमतरता आहे, परिणामी तपासकार्यावर त्याचा परिणाम होऊन गुन्हे उघडकीस (प्रकटीकरण) आणण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत, पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के गुन्ह्याचा तपास प्रलंबित होता. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोचा २०२२ चा अहवाल अद्याप प्रकाशित झाला नसल्याने २०२२ मधील नोंदवलेल्या गुन्हेगारी केसेसच्या प्रलंबित तपासाचे प्रमाण अद्याप स्पष्ट नाही”, असे म्हस्के यांनी सांगितले. (Mumbai Police)

जुलै २०२३ पर्यत मुंबई पोलीस दलातील मजूर पदे आणि कार्यरत पदे

मुंबई पोलीस दलाला पोलीस उपायुक्त दर्जाचे एकूण ४२ पदे मंजूर करण्यात आलेले असले तरी मुंबईत केवळ ३४ पोलीस उपायुक्त कार्यरत आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंजूर पदे १२८ कार्यरत ८३, पोलीस निरीक्षक मंजूर पदे १,०३१ कार्यरत ७७८, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजूर १,०९३ कार्यरत-९५७, पोलीस उपनिरीक्षक मंजूर ३,२६२ कार्यरत २,४९२, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंजूर ३२२२ कार्यरत २७४७ पोलीस हवालदार मंजूर ८२५० कार्यरत ९२२७, पोलीस नाईक मंजूर ७१९२ कार्यरत ६१५ ,पोलीस शिपाई मंजूर २१९६० कार्यरत १७०१४ तांत्रिक पदे मंजूर ५८४६ कार्यरत २,४६० एकूण मंजूर पदे ५२हजार ४४ हजार कार्यरत ३६ हजार ४२५. (Mumbai Police)

(हेही वाचा – Mumbai Festival : २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवल; गिरीश महाजन यांची घोषणा)

पॉइंटर
  • गेल्या १० वर्षात (२०१३ ते २०२२), बलात्कार आणि विनयभंगाच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे १३० टक्क्यांनी (३९१ वरून ९०१) आणि १०५ टक्क्यांनी (१,१३७ वरून २,३२९) वाढ झाली.
  • २०२२ मध्ये दाखल एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी ६३ टक्के केसेस अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या असून त्या POCSO खाली दाखल झाल्या.
  • POCSO खाली दाखल गुन्ह्यांपैकी ७३ टक्के केसेसचा तपास २०२२ च्या अखेरपर्यंत प्रलंबित होता. २०१८ मध्ये मुंबई पोलीस यंत्रणेतील रिक्त पदांचे प्रमाण २२ टक्के होते, जे २०२२ पर्यंत वाढून ३० टक्के झाले.
  • गुन्हे तपास अधिकाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी २२ टक्के पदे जुलै २०२३ पर्यंत रिक्त होती.
  • २०२२ च्या अखेपर्यंत एकूण ४४ टक्के केसेसची फोरेन्सिक चाचणी प्रलंबित होती आणि मार्च २०२३ अंती संबंधित फोसेन्सिक विभागात ३९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता होती.
  • २०१८ ते २०२२ या दरम्यान सायबर गुन्ह्यांमध्ये २४३ टक्क्यांनी वाढ झाली, म्हणजेच त्यांची संख्या १,३७५ वरून ४,७२३ पर्यंत वाढली. याच काळात क्रेडीट कार्ड घोटाळे/फसवणूकीच्या केसेसचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी (४६१ वरून ३,४९०) वाढले.
  • २०२२ मध्ये नोंदवलेल्या सायबर गुन्ह्यांमधील गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के होते. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.