IND Vs AUS 1st T20 : पहिल्या टी 20 मध्ये भारताचा थरारक विजय

156
IND Vs AUS 1st T20 : पहिल्या टी 20 मध्ये भारताचा थरारक विजय

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS 1st T20) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका होणार असून पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.

असा रंगला सामना …

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन (IND vs AUS 1st T20) विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या. जोश इंग्लिंश याने ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट राखून सहज पार केले. (IND vs AUS 1st T20)

(हेही वाचा – Sea link Bridge: देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, प्रवाशांसाठी अतिजलद प्रवासाचा मार्ग खुला)

सूर्या आणि ईशान या जोडीची कमाल

ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा (IND vs AUS 1st T20) खरपूस समाचार घेतला. 67 चेंडूमध्ये या दोघांनी 112 धावांची भागीदारी केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. ईशान किशन याने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादव याने 42 चेंडूत 80 धावांचे योगदान दिले. सूर्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजांची शाळा घेतली. सूर्याने चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. (IND vs AUS 1st T20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.