खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद सुरू होता. या वादादरम्यान भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी स्थगित केलेली ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. शुक्रवार, २४ नोव्हेंबरपासून ई-व्हिसा सेवा सुरू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
भारताने २१ सप्टेंबरला ई-व्हिसा सेवा स्थगित केली होती. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांनंतर भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची जूनमध्ये हत्या झाली होती. या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सहभागी असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर भारतात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. भारत सरकारने कॅनडावर आरोप लावताना पंतप्रधान ट्रुडो यांनी हेतुपुरस्सर आरोप केल्याचा दावा केला होता तसेच या प्रकरणात पुरावे सादर करण्याचे आव्हान कॅनडाला दिले. त्यानंतर कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तालयातील वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर उभय देशांमधील तणाव वाढला होता.
(हेही वाचा – Email Threat : “एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर… ; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल)