Uttarkashi Tunnel Accident : मजुरांची सुटका पुन्हा लांबणीवर

बचावकार्यात अडथळ्यांची मालिका सुरूच

127
Uttarkashi Tunnel Accident : मजुरांची सुटका पुन्हा लांबणीवर

उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून (Uttarkashi Tunnel Accident) झालेल्या दुर्घटनेत ४१ मजूर १२ नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. आज म्हणजेच शुक्रवार २४ नोव्हेंबर हा या बचावकार्याचा तेरावा दिवस आहे.

बचावकार्यात अडथळ्यांची मालिका

उत्तराखंडच्या (Uttarkashi Tunnel Accident) सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी पुन्हा अडथळा आला. त्यामुळे बचावकार्य पुन्हा थांबले असून मजुरांच्या सुटकेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.खोदकाम करणारे ऑगर यंत्र ठेवलेल्या प्लॅटफॉर्मला तडा पडल्याने खोदकाम गुरुवारी सायंकाळी पुन्हा थांबवावे लागले. २५ टन वजनाचे ऑगर यंत्र ज्या प्लॅटफॉर्मवर ठेवले आहे, तो बचाव मोहिमेतील कामगारांनी स्थिर केल्यानंतरच खोदकाम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Email Threat : “एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर… ; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल)

अशी होईल मजुरांची सुटका

सततच्या अडथळय़ामुळे ५७ मीटर लांबीच्या ढिगाऱ्यातील खोदकामाला बुधवारी (२२ नोव्हेंबर) रात्री सहा तास उशीर झाला. ऑगर यंत्र जसजसे खोदकाम करेल, तसतसे ढिगाऱ्यातून स्टील पाइपचा एकेक तुकडा आत घुसवला जाणार आहे. तुकडा दुसऱ्या बाजूने बाहेर आला, की अडकलेल्या मजुरांना (Uttarkashi Tunnel Accident) एकेक करून बाहेर काढले जाईल. या मजुरांना स्ट्रेचर्सवर झोपवून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.

(हेही वाचा – Mhada : म्हाडाच्या जमिनींची आणि इमारतींची कुंडली जाणून घेता येणार एका ‘क्लिक’वर)

कसे अडकले कामगार ?

सिल्क्यरा बोगद्यात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता हा अपघात घडला होता. बोगद्याच्या प्रवेशाच्या २०० मीटरच्या आत ६० मीटर माती खचली आणि ४१ मजूर आत अडकले. १६ नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण ७० मीटरपर्यंत पसरला आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.