IND vs AUS Rinku Singh : सिक्स मारून सामना जिंकवला मात्र ते रन खात्यात जमा झालेच नाही, काय आहे प्रकरण?

207
T20 World Cup 2024 : भारतीय संघात स्थान न मिळालेल्या रिंकू सिंगला सोशल मीडियावर चाहते म्हणाले ‘सॉरी’

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS Rinku Singh) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका होणार असून पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.

असा रंगला सामना …

या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन (IND vs AUS Rinku Singh) विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या. जोश इंग्लिंश याने ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट राखून सहज पार केले. (IND vs AUS Rinku Singh)

(हेही वाचा – Email Threat : “एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर… ; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल)

विजयी षटकार

भारताने 19.5 षटकात 208 धावा केल्या होत्या. रिंकू सिंह (IND vs AUS Rinku Singh) हा क्रीजवर होता आणि त्याच्यासमोर शॉन अॅबॉट होता. सीन अॅबॉटने चेंडू टाकला आणि त्यावर रिंकूने षटकार ठोकला. त्या षटकारावर भारताचा विजय निश्चित झाला आणि विजयी शॉट रिंकू सिंहच्या बॅटमधून आला असे सर्वांना वाटत होते, पण त्याआधीच भारताचा विजय निश्चित झाला.

(हेही वाचा – IND Vs AUS 1st T20 : पहिल्या टी 20 मध्ये भारताचा थरारक विजय)

म्हणून त्या सहा धावांची नोंद झाली नाही

खरंतर झाले असे की, शॉन अॅबॉटने टाकलेला सामन्यातील शेवटचा (IND vs AUS Rinku Singh) चेंडू हा ‘नो बॉल’ होता. त्यामुळे भारताने त्याच नो बॉलवर एका धावाने विजय मिळवला. यामुळे त्या सहा धावा रिंकूच्या खात्यात जमा होऊ शकल्या नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.