महाराष्ट्रातील आरोग्य सेवांना बळकटी यावी तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी व्हावी, (Asian Development Bank) यासाठी आशियाई विकास बँकेतर्फे ४१०० कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. इतके वित्तीय सहाय्य करण्यास आशियाई विकास बँकेच्या बोर्डाने मंजुरी दिली आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात स्वतंत्रपणे पदव्युत्तर अभ्यासक्रम (PG)चालू करणे तसेच सुपरस्पेशालिटी कॉलेज सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
(हेही वाचा – IND vs AUS Rinku Singh : सिक्स मारून सामना जिंकवला मात्र ते रन खात्यात जमा झालेच नाही, काय आहे प्रकरण?)
२०३० पर्यंत राज्यात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा देणारे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी हा निधी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आशियाई विकास बँकेबाबत (ADB) ७ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत या प्रस्तावाला गती देण्यात आली. केंद्र सरकारकडेसुद्धा याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आज हा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. एडीबी संचालक मंडळाचेसुद्धा त्यांनी आभार मानले आहेत.
आशियाई विकास बँकेतर्फे मिळणाऱ्या निधीत सध्या काही वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यात आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये जळगाव, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याशिवाय परभणी, रत्नागिरी, अमरावती, गडचिरोली, भंडारा आणि अंबरनाथ या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेची नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community