Chhagan Bhujbal : …म्हणून मुंबई सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळांवर ओढले ताशेरे

200
Chhagan Bhujbal : ...म्हणून मुंबई सत्र न्यायालयाने मंत्री छगन भुजबळांवर ओढले ताशेरे

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात ईडीच्या रडारवर असलेल्या मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) मुंबई सत्र न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यापुढे विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना सुनावलं आहे.

अधिक माहितीनुसार, ईडीने 2016 रोजी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

(हेही वाचा – Rajouri Encounter: राजौरीतील चकमकीत ५ जवान हुतात्मा, २ दहशतवाद्यांचा खात्मा)

न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण

भुजबळांना (Chhagan Bhujbal) सत्र न्यायालयाने फटकारताना लोकप्रतिनिधींवरील खटले जलदगतीने मार्गी लावावीत, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असल्याचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले. मात्र, अनेक खटल्यांमध्ये लोकप्रतिनिधींकडून वारंवार सुनावणी तहकुब करण्याची विनंती येते. परंतु, यापुढे असं घडणार नाही, अपरिहार्य कारणास्तव सुनावणी तहकूब केली जाणार नाही, अशी स्पष्ट तंबी मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.