जम्मू येथील (Jammu and Kashmir) अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ क्वाडकॉप्टरने टाकलेल्या ९ ग्रेनेड आणि आयईडीसह शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके सुरक्षा दलांनी गुरुवारी जप्त केली. नियंत्रण रेषेजवळील पालनवाला येथे पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान पहाटे सापडलेल्या एका पेटीत या सर्व वस्तू सापडल्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान या वस्तू जप्त करण्यात आल्या.
या पेटीच्या आतील बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाद्वारे ही पेटी उघडण्यात आली. तेव्हा पेटी उघडल्यावर त्यात आयईडी, तुर्की निर्मित पिस्तूल, दोन मॅगझिन, 38 राऊंड दारूगोळा आणि नऊ ग्रेनेड असल्याचे आढळून आले.
(हेही वाचा –Indian Navy: कतारमध्ये 8 माजी भारतीय नौसैनिकांचा अर्ज मंजूर, फाशीच्या शिक्षेविरोधात लवकरच होणार सुनावणी )
लष्कराच्या प्रवक्त्यांनी याबाबत सांगितले की, या भागात तैनात असलेल्या सैनिकांकडून क्वाडकॉप्टरसारख्या आवाजाच्या आधारे लॉकिखड पुलाच्या परिसरात सुरू केलेल्या पोलीस आणि लष्कराच्या शोध मोहिमेदरम्यान हा शोध लागला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शोध पथकाला ड्रॉप स्ट्रिंगसह एक पॅकेज सापडले, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, “जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि अखनूर सेक्टरमध्ये दहशतवादाला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने अखनूर सेक्टरमध्ये क्वाडकॉप्टरने पाडण्यात आलेल्या युद्धसदृश साठ्यांपैकी ही सर्वात मोठी जप्ती आहे. या घटनेबाबत खोर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community