कथित हेरगिरी प्रकरणात भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Naval Officers Qatar) या प्रकरणी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सरकारचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिष्टाई करण्यासाठी अन्य देशांची मदत घेण्याचाही प्रयत्न झाला. आता कतारकडून एक चांगली बातमी समोर आली आहे.
(हेही वाचा – Cyber Attack: ताज हॉटेलच्या समुहावर सायबर हल्ला, १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा हॅकर्सचा दावा)
अपील तपासल्यानंतर सुनावणीची तारीख
कतारमधील न्यायालयाने कथित हेरगिरी प्रकरणात गेल्या महिन्यात शिक्षा सुनावलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताचे अपील स्वीकारले आहे. कतारच्या न्यायालयाने स्पष्ट केले की, अपील तपासल्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित कण्यात येईल. (Naval Officers Qatar)
आरोप उघड नाहीत
ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारतीय नौदलाचे माजी अधिकारी पूर्णेंदू तिवारी, सुगुणाकर पाकला, अमित नागपाल, संजीव गुप्ता, नवतेज सिंग गिल, बिरेंद्र कुमार वर्मा, सौरभ वशिष्ठ आणि रागेश गोपकुमार यांचा समावेश आहे.
कतारने अद्याप त्यांच्यावरील आरोप उघड केलेले नाहीत. त्याचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला. गेल्या महिन्यात कतारच्या न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. (Naval Officers Qatar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community