Sudhir Mungantiwar : एवढा बाऊ कशाला! ‘त्या’ बॅनर बाबत मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण

सध्या ठाकरे गट व सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात एक्सवर सविस्तर पोस्ट करून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

105
Sudhir Mungantiwar : एवढा बाऊ कशाला! 'त्या' बॅनर बाबत मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण
Sudhir Mungantiwar : एवढा बाऊ कशाला! 'त्या' बॅनर बाबत मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बॅनरवरून सध्या राज्यात आकांडतांडव मांडले आहे. शिंदे यांच्या या बॅनरवर त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा होता. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता मंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ठाकरे गटाला या प्रकरणी उगीचच महत्त्व न देण्याचा सल्ला दिला आहे. (Sudhir Mungantiwar)

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ नोव्हेंबर रोजी राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्यासाठी प्रचारसभेत सहभाग घेतला. बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर्सही छापले होते. पण या बॅनर्सवर छापण्यात आलेल्या मजकुरावरून सध्या वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे. (Sudhir Mungantiwa)

शिंदे गटाला केलं लक्ष्य
राजस्थानच्या हवामहल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं बालमुकुंदाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या प्रचारसभेसाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुह्रदयसम्राट’ असा करण्यात आला आहे. यावरून सध्या ठाकरे गट व सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात एक्सवर सविस्तर पोस्ट करून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

(हेही वाचा : Cyber Attack: ताज हॉटेलच्या समुहावर सायबर हल्ला, १५ लाख ग्राहकांचा डेटा आपल्याकडे असल्याचा हॅकर्सचा दावा)

काय आहे पोस्ट मध्ये
“पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच..वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. दनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार”, अशी पोस्ट ठाकरे गटानं केली आहे.

New Project 2023 11 24T164731.586

 

असं मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.