DGCA Director Suspended : लाच म्हणून घेतले विमान; नागरी विमान महासंचालनालयाचे संचालक निलंबित

Anil Gill Corruption नागरी विमान महासंचालनालयाचे संचालक कॅप्टन अनिल गिल भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून निलंबित ! अनिल गिल त्याच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांसाठी किरकोळी किमतीत प्रशिक्षण विमाने घेत असत.

114
DGCA Director Suspended : लाच म्हणून घेतले विमान; नागरी विमान महासंचालनालयाचे संचालक निलंबित
DGCA Director Suspended : लाच म्हणून घेतले विमान; नागरी विमान महासंचालनालयाचे संचालक निलंबित

नागरी विमान महासंचालनालयाचे (Directorate General of Civil Aviation) संचालक कॅप्टन अनिल गिल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे. गिल यांनी उड्डाण प्रशिक्षण संस्थेकडून ३ प्रशिक्षण विमाने लाच म्हणून घेतली होती.  (DGCA Director Suspended)

(हेही वाचा – Naval Officers Qatar : आशा पल्लवित; कतारने अपील स्वीकारले)

अनिल गिल DGCAमध्ये उड्डाण आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक होते. त्यांना काही महिन्यांपूर्वीच डायरेक्टरेट ऑफ एअरोस्पेसचे संचालक म्हणून पदभार देण्यात आला होता. २५ ऑक्टोबरला डीजीसीएकडे गिल यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती.

सीबीआय आणि ईडी चौकशी

अनिल गिल यांच्यावर महिन्याभरापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यानंतर डीजीसीएने चौकशीसाठी व्हिजिलन्स समिती स्थापन केली. समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर गिल यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडीने सुरू केली आहे. (DGCA Director Suspended)

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : एवढा बाऊ कशाला! ‘त्या’ बॅनर बाबत मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण)

उड्डाण प्रशिक्षण संस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष

अनिल गिल त्याच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांसाठी किरकोळी किमतीत प्रशिक्षण विमाने घेत असत. त्यानंतर गिल ही विमाने इतर उड्डाण प्रशिक्षण संस्थांना भाड्याने देत असत. याबदल्यात अनिल ऑडिट दरम्यान उड्डाण प्रशिक्षण संस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करत असत. त्यात सुरक्षेशी संबंधित त्रुटींचा समावेश आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

काय आहे भ्रष्टाचार

ज्या उड्डाण प्रशिक्षण संस्थांना गिल यांना लाच देता यायची नाही, त्या संस्था नाममात्र किमतीत आपली उड्डाण प्रशिक्षण विमाने विकायच्या. या कंपन्यांमध्ये अनिल गिल यांची आई, त्यांच्या भावाची पत्नी, काकू, एक चुलत भाऊ संचालक आहेत. अनिल गिल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा त्यांचा दावा आहे. (DGCA Director Suspended)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.