Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं

पेंग्विनच्या देखभालीवरही काही कोटींचा खर्च दरवर्षी केला जातो.

236
Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं
Ranichi Baug : कोको,स्टेला आणि जेरी, मुंबईतील पेंग्विनच्या तीन पिल्लांचे झाले बारसं

मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या तीन पिल्लांचं बारसं करण्यात आलं. कोको, स्टेला आणि जेरी अशी नावं या तिघांना ठेवण्यात आली आहेत. तसेच यावेळी वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचा १६१ वा वर्धापन दिन सोहळाही संपन्न झाला. या कार्यक्रमा प्रसंगी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी हे उपस्थित होते. (Ranichi Baug)

पेंग्विनच्या देखभालीवरही काही कोटींचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र पर्यटकांना (tourist) मुंबईमधील वातावरणात परदेशातील पेंग्विन बघायला मिळतात व त्यामुळे बच्चे कंपनी आणि महिला वर्ग यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.सुरुवातीचे तीन महिने त्यांना तेथील कृत्रिम वातावरणात रुळवण्यात गेले. मात्र नंतर त्यांचे दर्शन मुंबईकरांसह देश – विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना घेता आले. (Ranichi Baug)

(हेही वाचा :Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे)

हम्बोल्ट पेंग्विन कक्षातील तीन नवीन पिल्लांच्या नामकरण सोहळा पार पडला त्यांची कोको स्टेला व जेरी अशी नावे ठेवण्यात आली.१६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील विविध वनस्पतींच्या तसेच वाळवंटात आढळणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाझुडपांच्या प्रदर्शनाचे उदघाट्न करण्यात आले. (Ranichi Baug)

‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने प्लास्टिक पासून तयार केलेले १५ बेंचेस प्राणिसंग्रहालयास भेट देण्यात आले व प्राणिसंग्रहालयात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी बसवण्यात आले. पर्यटकांच्या सुविधेसाठी मनराव चॅरिटेबल ट्रस्ट चा वतीने प्राणिसंग्रहालयास मिळालेल्या ५ व्हीलचेअर्स देखील हस्तांतरित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुंबई प्राणिसंग्रहालयातील गांडूळ खत प्रकल्पावर काम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांनी केलेल्या गांडूळ खत विक्रीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.