Smile : उत्पत्तीस्थळीच डासांचा नायनाट, महापालिकेने खरेदी केल्या सुमारे १९ हजार बायोट्रुप

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संशोधन करून बनवण्यात आलेली उपकरणे आता मुंबईतील विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहे.

161
Smile : उत्पत्तीस्थळीच डासांचा नायनाट, महापालिकेने खरेदी केल्या सुमारे १९ हजार बायोट्रुप
Smile : उत्पत्तीस्थळीच डासांचा नायनाट, महापालिकेने खरेदी केल्या सुमारे १९ हजार बायोट्रुप

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संशोधन करून बनवण्यात आलेली उपकरणे आता मुंबईतील विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहे. मुंबईतील सहा ठिकाणी बसवण्यात आलेल्या या उपकरणांच्या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई महापालिकेने अशाप्रकारची सुमारे १९ हजार उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

डासांचा प्रादुर्भाव कमी करण्याबाबत इको बायो कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने संशोधन करून नाविन्यपूर्ण प्रक्रिया व उपकरण विकसित केले होते. या पध्दतीमुळे व त्यांच्या उपकरणांमुळे डेंग्यू व इतर रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या डासांचा नायनाट होऊन त्यांच्या उत्पत्तीस्थळीच डासांच्या अळ्या नष्ट करणे शक्य होते.

त्यानुसार मुंबई महापालिकेने प्रायोगिक तत्वावर धारावी कुंभारवाडा, अण्णा नगर, मुस्लिम नगर, धारावी बस आगार राजीव गांधी सरकारी क्रिडा संकुल, माहिम फाटक, दादर इंदु मिल, गोखले रोड आणि दादर भवानी शंकर रोड महापालिका शाळा आदी ठिकाणांवर १८ जागी ही उपकरणे बसवण्यात आली होती. यांच्या यशस्वी प्रयोगानुसार मुंबई महापालिकेने १८ हजार ७२० बायो ट्रुप अर्थात उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रति उपकरणांसाठी ६६० रुपये मोजले जाणार असून यांच्या खरेदीसाठी १ कोटी २३ लाख रुपये आणि उपाययोजना आणि निरीक्षण खर्च या करता ३५ लाख रुपये, प्रकल्प व्यवस्थापन खर्च म्हणून २१ लाख रुपये, देखरेख खर्च ५६ लाख रुपये तसेच वाहतूक खर्च म्हणून २६ लाख रुपये अशाप्रकारे एकूण २.६२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध करांसह तब्बल ३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. इको बायो कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडूनच ही उपकरणे खरेदी केली जाणार असून स्टार्टअपमार्फत ही सेवा खरेदी केली जात असल्याचे व्यावसायिक विकास विभागाने स्पष्ट केले.

(हेही वाचा – Mumbai AirPort : विमानतळ उडविण्याची धमकी देणाऱ्याला केरळ मधून अटक)

व्यवसाय विकास विभाग अंतर्गत महापालिकेच्या सोसायटी फॉर मुंबई इक्युबेशन लॅब टू एंटरप्रन्योरशिप कौन्सिल अर्थात स्माईल (Smile) या बिझनेस इक्युबेशन सेंटरची स्थापना करयात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून तयार होणारी विविध उत्पादन, सेवा व सुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर खरेदी व वापरात आणण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार इको बायो कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून प्रायोगिक तत्वावर १८ जागी ही उपकरणे बसवण्याचा निर्णय घेतला होता. या कंपनीने महापालिकेच्या किटकनाशक विभागाच्या माध्यमातून ही उपकरणे बसवली होती. या उपकरणामुळे डेंग्यू व इतर रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या डासांचा जन्म होण्यास आळा बसेल. यामुळे डासांपासून होणाऱ्या रोगाचे प्रमाण कमी होईल व अशा जीवघेण्या आजारांपासून परिसरातील नागरिकांचा बचाव होईल असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.