वीरेंद्र हेगडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९४८ रोजी कर्नाटक येथे झाला. ते धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी आहेत. त्यांनी हेमावती हेगडे यांच्याशी लग्न केले. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊने सन्मानित केले होते. तसेच २००० मध्ये त्यांना भारत सरकारने समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते. (Virendra Hegde)
हेगडे कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त तुलू जैन बंट वंशाच्या परगडे घराण्यातील आहेत. हे कुटुंब जैन समाजाचे असले तरी ते हिंदू मंदिराचे विश्वस्त आहेत.
वीरेंद्र हेगडे हे थोरले सुपुत्र म्हणून वडिलांनंतर ते धर्माधिकारी झाले. धर्मस्थळ मंदिराचे धर्माधिकारी पद भूषविणारे परगडे घराण्याचे ते एकविसावे सदस्य आहेत. ते मंदिराचे आणि त्यासंबंधित मालमत्तेचे प्रशासक म्हणून काम पाहतात. विशेष म्हणजे जुलै २०२२ पासून राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार देखील झाले आहेत. (Virendra Hegde)
(हेही वाचा : Smile : उत्पत्तीस्थळीच डासांचा नायनाट, महापालिकेने खरेदी केल्या सुमारे १९ हजार बायोट्रुप)
त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे आणि त्यांच्या योगदानांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २००९ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा कर्नाटकातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो. ते सर्वधर्म साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. ते एक उत्तम प्रशासक आहेत आणि त्यांच्या प्रशासनांतर्गत मंदिराद्वारे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community