Air Pollution : धूळ प्रतिबंधक उपाययोजना उल्लंघन : महापालिका मुख्यालयातील ‘त्या’ कंत्राटदाराला दंड

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सध्या नुतनीकरणाचे काम सुरु असून त्याठिकाणी बांधकामाच्या धुळीचे प्रमाण दिवसभरात प्रचंड वाढले आहे.

166

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सध्या नुतनीकरणाचे काम सुरु असून त्याठिकाणी बांधकामाच्या धुळीचे प्रमाण दिवसभरात प्रचंड वाढले आहे. या बांधकामाच्याठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रदुषणासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने ‘महापालिकेच्या दिव्याखाली अंधार, मुख्यालयातच धुळीचे साम्राज्य’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना करत त्यांना दंडात्मक कारवाई केली. (Air Pollution)

मुंबईतील प्रदुषणाचे (Air Pollution) प्रमाण वाढल्याने हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक नियमावली तयार करून त्यानुसार बांधकामांच्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना करत त्यानुसार नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटीसनंतरही ज्या ज्या बांधकामांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाही, त्या बांधकामांना कारणे दाखवा नोटीस आणि स्टॉप वर्क नोटीस दिल्या जात आहेत.

मात्र, एका बाजुला मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी बांधकामांना नोटीस देत असले तरी महापालिका मुख्यालयातील विस्तारित इमारतींमध्ये नुतनीकरणाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महापालिका सचिव विभाग कार्यालयाच्या जागेवर नुतनीकरणाचे काम सुरु असून याठिकाणी हिरवा कपडा लावून या भाग बंदिस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे बुधवारी दिवसभर या मजल्यावर धुळीचे साम्राज्य पसरले होते. या धुळीमुळे कर्मचाऱ्यांना व्हरांड्यातून फिरवणेही अशक्य बनले होते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना या पॅसेजमधून जाताना तोंडाला रुमाल बांधूनही ये जा करावी लागत होती.

(हेही वाचा – Air Pollution : महापालिकेच्या दिव्याखाली अंधार, मुख्यालयातच धुळीचे साम्राज्य)

या बाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी महापालिका मुख्यालय इमारतीचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश त्यांना नोटीस जारी करण्यास लावले. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराला २५ हजारांचा दंड आकारून त्यांना बांधकामाच्या ठिकाणी हिरवा कपडा लावून चारही बाजू बंदिस्त करणे तसेच तोडकाम करण्यात आलेल्या जागी पाण्याचा मारा करणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ राबविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार संबंधित कंत्राटाराने तात्काळ उपाय योजना राबवून त्याची अंमलबजावणीही करायला सुरुवात केली. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.