Israel-Hamas Conflict: हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या २४ जणांना इस्रायलला पाठवले

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गाझा पट्टीतील युद्ध चार दिवस थांबवण्यासाठी करार झाला आहे.

171
Israel-Hamas Conflict: हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या २४ जणांना इस्रायलला पाठवले
Israel-Hamas Conflict: हमासने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या २४ जणांना इस्रायलला पाठवले

इस्रायल-हमास यांच्यातल्या युद्धबंदीच्या (Israel-Hamas Conflict) कराराच्या दुसऱ्या दिवशी हमासने पहिल्यांदाच गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 24 जणांना सोडवून इस्रायलला पाठवले. त्याबदल्यात इस्त्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका केली आहे.

हमासने इस्रायलवर हल्ला केला तेव्हा सुमारे २५० लोकांचे अपहरण करण्यात आले होते. या सर्व ओलिसांची सुटका करण्याचे कार्य इस्रायल सध्या करत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गाझा पट्टीतील युद्ध चार दिवस थांबवण्यासाठी करार झाला आहे. या करारानुसार शुक्रवारपासून (२४ नोव्हेंबर) ४ दिवस गाझामध्ये बॉम्बस्फोट होणार नाहीत. त्या बदल्यात हमास चार दिवसांत ५० ओलिसांची सुटका करेल, तर इस्राइल तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींची सुटका करणार आहे.

(हेही वाचा – Crime : दहा कोटींच्या खंडणीसाठी दक्षिण मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाचे अपहरण )

इस्रायली तुरुंगातील ओलिसांची सुटका  

हमासने शुक्रवारी, २४ नोव्हेंबरला २४ ओलिसांची सुटका केली, ज्यात १३ इस्रायली, १० थाई आणि 1 फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे. त्या बदल्यात इस्रायली तुरुंगात कैद असलेल्या ३९ पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यात आली. इस्राइलच्या तुरुंगात सुमारे ८३०० पॅलेस्टिनी कैदी आहेत. मोसाद आणि इस्राइलच्या संरक्षण विभागाला शनिवारी जाहीर होणार्‍या ओलिसांची दुसरी यादी मिळाली आहे. ओलिसांची सुटका करणाऱ्या अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. ओलिसांना इस्राइलच्या सुरक्षित हातात परत येईपर्यंत ही यादी जाहीर केली जाणार नाही.

युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, 

युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की, युद्ध थांबल्याच्या पहिल्या दिवशी मानवतावादी मदत असलेले १३७ ट्रक गाझाला पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारपासून गाझामध्ये १.३ लाख लिटर डिझेल आणि चार ट्रक गॅसची पोहोचवले जातील. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर गाझाला पोहोचलेली ही सर्वात मोठी मदत असेल.

ओलिसांची सुटका हे या युद्धाचे प्रमुख उद्दिष्ट

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या सर्व लोकांची सुटका करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. ओलिसांची सुटका हे या युद्धाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. युद्धातील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.