Local Products Of Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक उत्पदनांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात जोरदार मागणी

मसाले, गुळ, हळद, मध, पैठणी, मनुका, कोल्हापूरी चप्पल यास खास मागणी

183
Local Products Of Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक उत्पदनांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात जोरदार मागणी

कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठनची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपारिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जोरदार मागणी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. (Local Products Of Maharashtra)

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय (Local Products Of Maharashtra) उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रसिध्द प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान आयेाजन करण्यात येते. या मेळ्यात विदेशातील उद्योग दालने आणि देशातील प्रत्येक राज्याची दालने मेळाव्याचे खास आकर्षण असते. मेळाव्याच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहक व ग्राहकांनाही थेट उत्पादन मिळते. यावर्षी, ‘वसुदेव कुटुंबकम-युनिटी इन ट्रेड’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या धरतीवर महाराष्ट्र दालन ही सजविण्यात आले आहे.

महाराष्ट्र दालनात एकूण 48 स्टॉल्स लावण्यात आले

यामध्ये कोल्हापूर चप्पल, गुळ, मसाले, सांगलीची हळद, मनुका, चटई महाबळेश्वरचा मध, नागपूरचे संत्रे, पैठणी पर्स, नंदुरबारचे मसाले, पापड व चटण्या, सोलापूरचे टेरी टॉवेल, धारावीचे चामडा बॅग, माथेरानची चप्पल, घर सुशोभी करण्याच्या वस्तू, हँड पेंटिंग, विविध क्लस्टर व महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू आदि वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. (Local Products Of Maharashtra)

(हेही वाचा – Local Train Megablock : जाणून घ्या कुठल्या मार्गावर कसा असणार ‘ब्लॉक’)

सांगलीचे (Local Products Of Maharashtra) बापूसो शामराव चव्हाण यांनी त्यांच्या दालनात सर्व प्रकारच्या ज्यूट चटई, वॉल हॅगिंग, लेटरबॉक्स, बस्तर, शतरंज्या, टेबल मॅट आदि विक्रिसाठी ठेवल्या आहेत.

या दालनात महाराष्ट्र (Local Products Of Maharashtra) राज्य खादी व ग्रामोउद्योग बोर्डाकडून गाळा उभारला गेला आहे. या गाळ्यात प्रामुख्याने सेंद्रीय मध विक्रीसाठी ठेवले आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जंगलात मधमाशांच्या मधपेट्या ठेऊन, मध संकलन करण्यासाठी वन खात्याची मान्यता घेऊन, आम्ही सेंद्रीय मध तयार करत असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. संपूर्ण देशी तंत्रज्ञानाने व शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात येते व रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता असणारा उद्योग असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षण उपोषणावेळी दगडफेक करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक)

नागपूर (Local Products Of Maharashtra) येथील ‘माऊली क्रिएशन्स’ स्टॉल ला पैठणीचे आकर्षक पर्स, हँड बॅग, साड्या, दुप्पटा, डायरी सारख्या वस्तु श्रीमती मृणाल दाणी व अस्मिता यांनी विक्रिस ठेवल्या आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठ्या व आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाल्याचा व त्यांच्या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांनी आंनद व्यक्त केला व पुन्हा या मेळ्यात सहभागी होण्याची आशाही व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.